September 14, 2024 9:31 AM

सर्वसमावेशक विकास आणि कायद्याचं राज्य ही संकल्पना देशात मूळ धरू लागली असल्याचं एस. जयशंकर यांचं प्रतिपादन

आधुनिक भारताची टप्प्याटप्प्याने उभारणी होत असून, सर्वसमावेशक विकास आणि कायद्याचं राज्य ही संकल्पना देशात मूळ धरू लागली आहे असं प्रतिपादन केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी केलं आहे. हीच तत्त्व आणि धोरण केंद्रस्थानी ठेवून सरकार कारभार करत आहे. ते काल जिनिवा इथं भारतीय जनसमुदायाला संबोधित करताना बोलत होते.   सरकार महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देत आहे. जी-20 परिषदेच्या अध्यक्षकाळात याच संकल्पनेवर भर देण्यात आला होता असं ते पुढे म्हणाले. जयशंकर यांनी देशात झालेल्या निवडणुक...

July 2, 2024 2:24 PM

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर शांघाय सहकार्य संघटना परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार

कझाकिस्तानच्या अध्यक्षतेखाली अस्ताना इथं ४ जुलैपासून  होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटना परिषदेत सहभागी होणाऱ्या भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर करणार आहेत.  शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या प्रमुखांची ही २४ वी बैठक असून या बैठकीत गेल्या दोन दशकातल्या विविध आंतरराष्ट्रीय घडामोडींची समीक्षा करण्यात येणार आहे. या बरोबरच सदस्य देशांमधील परस्पर सहकार्य आणि प्रांतीय त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर चर्चा होईल. या बैठकीत भारताची बाजू प्रधानमंत्री नरेंद्र ...