September 18, 2024 8:01 PM

संशोधन आणि विकास क्षेत्रात महिलांचा अधिकाधिक सहभाग महिलांचं जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक – राष्ट्रपती

संशोधन आणि विकास क्षेत्रात महिलांचा अधिकाधिक सहभाग हा फक्त देशाच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा नसून महिलांचं जीवनमान उंचावण्यासाठी देखील आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज जयपूर इथे मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अठराव्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. अलिकडच्या काळात देशात मुलींच्या नोंदणीत वाढ होणं ही आनंदाची बाब असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या.

July 16, 2024 6:45 PM

राष्ट्रपती मुर्मू यांनी न्यायमूर्ती एन कोटीश्र्वर सिंग आणि आर महादेवन यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून केली नियुक्ती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती एन कोटीश्र्वर सिंग आणि आर महादेवन यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायमूर्ती एन कोटीश्र्वर सिंग सध्या जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. तर न्यायमूर्ती आर महादेवन मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत.