August 23, 2024 1:49 PM

views 1

पृथ्वी-२ या आण्विक क्षमतेच्या बॅलिस्टीक क्षेपणास्त्राची आणखी एक चाचणी यशस्वी

भारताने काल पृथ्वी-२ या आण्विक क्षमतेच्या बॅलिस्टीक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. रात्री ओदिशातल्या समुद्रकिनाऱ्यावर ही चाचणी झाली. डीआरडीओ म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेलं हे क्षेपणास्त्र ५०० ते एक हजार किलोग्रॅम वजनाचा शस्त्रभार घेऊन जाऊ शकते. पृष्ठभागावरुन साडेतीनशे किलोमीटर पर्यंत मारा करु शकणाऱ्या पृथ्वी-२ ला दोन इंजिनं लावली आहेत. या चाचणीच्या वेळी डीआरडीओचे अधिकारी तसंच वैज्ञानिक  उपस्थित होते. 

June 28, 2024 11:23 AM

डीआरडीओच्या सलग ६ विकासात्मक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण

    संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओनं विकसित केलेल्या अत्याधुनिक अभ्यास या या स्वदेशी प्रणालीने सलग सहा विकासात्मक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. या प्रणालीच्या अद्यापपर्यंत १० विकासात्मक परीक्षण चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'अभ्यास'च्या विकासात्मक चाचण्यांसाठी डीआरडीओ, सशस्त्र दल आणि संबंधित उद्योग गटाचं कौतुक केलं आहे.