September 19, 2024 12:56 PM

संस्कृती आणि नागरीकरणाची परंपरा अनेक शतकांपासून उज्जैनमध्ये अस्तित्वात- राष्ट्रपती

संस्कृती आणि नागरीकरणाची परंपरा अनेक शतकांपासून उज्जैनमध्ये अस्तित्वात होती, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. उज्जैनमध्ये आज सफाई मित्र संमेलनाला त्यांनी संबोधित केलं. उज्जैन - इंदूर ६ पदरी महामार्गाचं आभासी माध्यमातून त्यांनी भूमीपूजनही केलं.   गेल्या १० वर्षात स्वच्छता अभियान राष्ट्रव्यापी झालं असून त्यातून देशात मोठे बदल दिसून आल्याचं त्या म्हणाल्या. मध्य प्रदेशातली अनेक शहरं सफाई मित्र सुरक्षित शहरं म्हणून जाहीर झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. 

September 7, 2024 3:17 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असणाऱ्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचं आगमन भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या आजच्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये मोठ्या उत्साहात झालं. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असलेला हा अनोखा उत्सव अनुभवण्यासाठी अनेक परदेशी पर्यटकांचं आगमनही मुंबई - पुण्यात झालं आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सव काळात राज्यात सुमारे ११ हजार कोटी रुपयांहून अधिक व्यापार होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आण...

September 4, 2024 1:17 PM

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदकं जिंकल्याबद्दल राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांकडून खेळाडूंचं अभिनंदन

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदकं जिंकल्याबद्दल शरद कुमार, मरियप्पन थंगावेलू, अजित सिंग आणि सुंदर सिंग या खेळाडूंचं,  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  अभिनंदन केलं आहे.  या खेळाडूंची  कामगिरी ही शाश्वत उत्कृष्टतेची उदाहरणे असून त्यांचं यश उच्च आंतरराष्ट्रीय दर्जा गाठण्याची आकांक्षा असलेल्या खेळाडूंना प्रेरणा देईल, असं राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती धनखड यांनी या खेळाडूंचं अभिनंदन करताना भारताला य...

September 4, 2024 9:58 AM

महाराष्ट्र विधान परिषदेनं जबाबदार वरिष्ठ सभागृहाची भूमिका यशस्वीपणे बजावल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांचे गौरवोद्गार

विधान परिषदेनं विविध महत्वपूर्ण निर्णय, कायदे करण्याबरोबरच लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचं काम केलं आहे; एका जबाबदार वरिष्ठ सभागृहाची भूमिका यशस्वीपणे बजावत, देशाच्या संसदीय प्रणालीत महाराष्ट्र विधीमंडळाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मू यांनी काढले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करताना त्या काल मुंबईत बोलत होत्या. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून केली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विधा...

June 29, 2024 9:39 AM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर राज्यसभेत चर्चा सुरू

राज्यसभेत विरोधकांनी नीट परीक्षा गैरप्रकार प्रकरणी केलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काल, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या संयुक्त सत्राला उद्देशून केलेल्या अभिभाषणावर चर्चा सुरू झाली. या चर्चेसाठी 21 तास राखून ठेवण्यात आले आहेत. कालच्या चर्चेदरम्यान भारतीय जनता पार्टीनं कॉंग्रेसवर टीका केली. कॉंग्रेस पक्ष सत्तेवर असतो, तेव्हा तेव्हा राज्यघटना धोक्यात असते असा आरोप करण्यात आला. राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत बदलांसह अनेक उदाहरणं देण्यात आली.   दरम्यान, लोकसभेत विरोधक नीट मुद्द्यावर चर...

June 28, 2024 8:55 AM

१८वी लोकसभा अनेक बाबतीत ऐतिहासिक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन

देशातल्या जनतेनं या सरकारला तिसऱ्यांदा निवडून देऊन, गेल्या दहा वर्षातल्या सेवा आणि सुशासनावर पसंतीची मोहोर उमटवली आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल केलं. अठराव्या लोकसभेच्या स्थापनेनंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला त्यांनी संबोधित केलं. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार आपल्या आकांक्षा पूर्ण करेल, असा जनतेला विश्वास वाटतो, असं संगत; अठरावी लोकसभा अनेक बाबतीत ऐतिहासिक असल्याचं त्या म्हणाल्या.   पेपर फुटीप्रकरणी सरकार ठोस उपाययोजना करत आहे, य...

June 19, 2024 9:07 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची विशेष मुलाखत २० जून रोजी सकाळी ८.४५ वा. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची विशेष मुलाखत उद्या सकाळी पावणे ९ वाजता आकाशवाणी गोल्डसह देशभरातल्या आकाशवाणी केंद्रांवरुन प्रसारित होईल. राष्ट्रपतींच्या वाढदिवसानिमित्त माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ही मुलाखत घेतली आहे. आकाशवाणीचं युट्युब चॅनल आणि इतर सोशल मीडियावरही ही मुलाखत ऐकता येईल.