September 21, 2024 12:22 PM

सर्व शैक्षणिक संस्थांनी मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहित करावं- राष्ट्रपतींचं आवाहन

सर्व शैक्षणिक संस्था आणि शिक्षकांनी मुलींना उच्च शिक्षण आणि स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. इंदूरमधील देवी अहिल्या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती काल संबोधित करताना बोलत होत्या. पालक आणि शिक्षकांचा पाठिंबा आणि मार्गदर्शनानं मुली मोठी स्वप्नं पाहू शकतात आणि ती पूर्ण करू शकतात, देशाच्या विकासात ही खरी भागीदारी होऊ शकते असंही मुर्मू म्हणाल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता आणि आवडींच्या आधारे त्यांच्या भविष्यातील कार...

September 4, 2024 8:07 PM

प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढणं आवश्यक – राष्ट्रपती

  प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढणं आवश्यक असून, त्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात लातूर जिल्ह्यात उदगीर इथं महिला सक्षमीकरण मेळाव्यात त्या बोलत होत्या. प्रत्येक क्षेत्रात महिलांची सक्रीय भागीदारी वाढवण्यासाठी बचत गटांची भूमिका महत्वाची असल्याचं त्या म्हणाल्या. राज्य सरकार महिलांचं आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करत असल्याचं सांगून त्यांनी, महिलांनी आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करावं, आ...

August 9, 2024 1:11 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ऑकलंड भारतीय समुदायाशी संवाद साधणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपल्या दोन दिवसीय न्यूझीलंड दौऱ्यात आज ऑकलंड इथं आयोजित एका नागरी स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायाशी आणि भारताच्या मित्र परिवाराशी संवाद साधणार आहेत. न्यू झीलंडमध्ये ३ लाखाहून अधिक भारतीय राहतात.    दरम्यान, न्यू झीलंड बरोबरचे राजनैतिक  संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत ऑकलंडमध्ये वाणिज्य दूतावास उघडणार असल्याचं राष्ट्रपतींनी काल त्यांच्या सन्मानार्थ आयोजित मेजवानीवेळी बोलताना सांगितलं.

July 1, 2024 1:53 PM

संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावर चर्चा सुरु

संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या अभिभाषणाबद्दल मांडण्यात आलेल्या आभारप्रस्तावावर चर्चेला सुरुवात झाली. भाजपा खासदार अनुराग सिंह ठाकुर यांनी केंद्र सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या लोककल्याणकारी योजनांचं आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाचा उल्लेख केला. भाजपा सरकारच्या काळात २५ कोटी लोकसंख्या गरिबीतून वर आली, तसंच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं गेलं असं ते म्हणाले.   संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारवर त्यांनी टीका केली. तत...