September 17, 2024 6:12 PM
दलितांच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही – केंद्रीय मंत्री रामदास आठवले
दलितांच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही, त्यांचं आरक्षण आहे तसचं राहील, असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज पालघर जिल्ह्यात डहाणू इथं दिव्यांग बांधवांसाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र सरकारच्या एडिप योजनेअंतर्गत दिव्यांगांना मोफत सहायक उपकरणांचं वाटप यावेळी आठवले यांच्या हस्ते करण्यात आलं. वाढवण बंदरा विषयी आठवले म्हणाले, की देशातलं हे मोठ बंदर असून देशाच्या आर्थिक विकासात त्याचा ...