August 22, 2024 7:39 PM

दिल्ली पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये अल कायदा दहशतवादी संघटनेशी संबधित १४ जणांना अटक

दिल्ली पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकानं देशभरात विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबधित १४ जणांना अटक करण्यात आली असून शस्त्रात्रही जप्त करण्यात आली आहेत. झारखंडच्या रांची इथल्या डॉ. इश्तियाक नामक हा मुख्य आरोपी असून विविध ठिकाणी मोठ्या दहशतवादी कारवाया करण्याची त्याची योजना असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

July 30, 2024 8:45 PM

दिल्लीत तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नोटीस

दिल्लीत तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिल्लीचे मुख्य सचिव, दिल्ली पोलीस आयुक्त आणि दिल्ली महानगरपालिकेच्या आयुक्तांना नोटिस बजावली आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल दोन दिवसात सादर करावा असं यात म्हटलं आहे. तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दिल्लीतल्या कोंचिंग सेंटर्स आणि संस्थांची संख्या जाणून घेण्यासाठी दिल्लीच्या मुख्य सचिवांनी सखोल सर्वेक्षण करावं असं आयोगानं म्हटलं आहे.