August 21, 2024 1:25 PM

पूजा खेडकरला २९ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

महाराष्ट्रातील निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर हिला येत्या २९ ऑगस्टपर्यंत अटक करण्यात येऊ नये, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पूजा खेडकर हिला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ ऑगस्टला होईल, असा न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी यावेळी नमूद केलं.   दिल्ली उच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीवेळी यूपीएससीनं सादर केलेला जबाब आपल्याला कालच मिळाला आहे. त्यामुळे त्याला उत्तर देण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी पूजा खेडकर हिच्या ...

August 12, 2024 3:42 PM

पूजा खेडकर यांना २१ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

बडतर्फ प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना २१ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. नागरी सेवा परीक्षा फसवणूक करून उत्तीर्ण झाल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांनी खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या जामिन अर्जावर न्यायालयानं दिल्ली पोलिस आणि केंद्रीय लोकसवा आयोगाकडून उत्तर मागवलं आहे.

June 25, 2024 3:10 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला स्तगिती

दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला स्थगिती दिली आहे. ईडीनं सादर केलेली कागदपत्र विशेष न्यायालयानं नीट पाहिली नाही, असं कारण उच्च न्यायालयानं जामीनाला स्थगिती देताना दिलं आहे.