September 12, 2024 1:25 PM

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेनं भारताची वाटचाल वेगानं होत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन

  संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेनं भारताची वाटचाल वेगानं होत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. भारतीय हवाई दलातर्फे राजस्थानात जोधपूर इथं आयोजित तरंग शक्ती विमान सरावाची पाहणी केल्यानंतर आज ते बोलत होते. या सरावाच्या निमित्तानं हवाई दलानं आयोजित केलेल्या भारतीय संरक्षण हवाई प्रदर्शन म्हणजे आयडॅक्स-२४ चं उद्घाटन  संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते झालं. आजपासून चौदा तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात विमानविषयक सामुग्री उत्पादन क्षेत्रातल्या कंपन्यांचा मोठा ...

August 26, 2024 12:59 PM

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची अमेरिकेतल्या राष्ट्रीय नागरी हक्क संग्रहालयाला भेट

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल अमेरिकेतल्या राष्ट्रीय नागरी हक्क संग्रहालयाला भेट दिली आणि टेनेसी मधल्या मेम्फिस इथं भारतीय समुदायाशी संवाद साधला. राजनाथ सिंह यांचा अमेरिका दौऱ्याचा  काल शेवटचा दिवस होता. मेम्फिस, अटलांटा आणि नॅशव्हिल इथल्या भारतीय समुदायाबरोबर संवाद साधताना सिंग यांनी भारतीय समुदायाच्या समाज, विज्ञान आणि अर्थव्यवस्थेतल्या योगदानाचं कौतुक केलं. हे राष्ट्रीय नागरी हक्क संग्रहालय १७ व्या शतकातलं अमेरिकेच्या नागरी हक्क चळवळीचा इतिहास सांगणारं असून या ठिकाणी महात्मा गांधींचा ए...

August 24, 2024 11:14 AM

भारत – अमेरिका दरम्यान महत्त्वाचा संरक्षण करार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.  संरक्षण मंत्र्यांच्या या भेटीत भारत आणि अमेरिकेत पुरवठा सुरक्षा व्यवस्था करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. या करारातून परस्परांना संरक्षण सामग्री पुरवठ्यात प्राधान्य देण्याचं मान्य झालं.    अमेरिकेबरोबर असा करार करणारा भारत हा अठरावा देश आहे.  दोन्ही देशांमध्ये संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबतही सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.  सध्या आणि भावी काळातल्या संरक्षण विषयक सहयोगासंदर्भात राजनाथ सिंह अमेरिकन संरक्षण उद्योगाबरोबर...

August 19, 2024 11:01 AM

चेन्नईतल्या भारतीय तटरक्षक दलाच्या प्रादेशिक मुख्यालयातील प्रादेशिक सागरी प्रदूषण प्रतिसाद केंद्राचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल चेन्नईतल्या भारतीय तटरक्षक दलाच्या प्रादेशिक मुख्यालयातील प्रादेशिक सागरी प्रदूषण प्रतिसाद केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. प्रादेशिक सागरी प्रतिसाद केंद्र तेल गळतीच्या प्रतिसादासाठी एकात्मिक दृष्टीकोन सुनिश्चित करून या भागातील देशांमध्ये समन्वय सुलभ करेल. यामुळे तेल गळतीला अधिक एकजुटीने प्रभावी प्रतिसाद देता येऊ शकेल तसंच त्यासाठीची खास उपकरणं आणि प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध होण्यास मदत होण्यासोबतच त्यावर प्रत्येक देशाला वैयक्तिकरीत्या शक्य नसलेले नावीन...

August 18, 2024 1:21 PM

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चेन्नई इथं भारतीय तटरक्षक दलाच्या सागरी बचाव समन्वय केंद्राचं उद्घाटन करणार

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज चेन्नई दौऱ्यावर जात आहेत. या भेटीदरम्यान भारतीय तटरक्षक दलाकडून चेन्नईत उभारण्यात आलेल्या नव्या अत्याधुनिक सागरी बचाव समन्वय केंद्राचं तसंच सागरी प्रदुषण प्रतिसाद केंद्र तसंच पुद्दुचरी इथं उभारण्यात आलेलं तटरक्षक दलाच्या एअर एन्क्लेव्हचं उद्घाटनही सिंह यांच्या होणार आहे. चेन्नईस्थित प्रदुषण केंद्र, सागरी प्रदुषण व्यवस्थापनातलं अग्रगण्य पाऊल आहे. या केंद्रामुळे सागरी प्रदुषणाच्या घटना विशेषतः किनारपट्टीलगतच्या राज्यांमध्ये होणाऱ्या तेल आणि रसायन गळतीच्या घटनांमध्ये प्...