September 25, 2024 2:54 PM

माथाडींसाठीचा कायदा आणखी मजबूत करण्यात येईल, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं आश्वासन

माथाडी कामगारांचा मोबदला स्वतःच्या खिशात टाकणाऱ्यांवर सरकारने कारवाई केली असून यापुढेही अशी कारवाई करण्यात येईल, माथाडींसाठीचा कायदा आणखी मजबूत करण्यात येईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांची जयंती आणि गुणवंत कामगार पुरस्काराचा वितरण समारंभ नवी मुंबईत झाला, त्यावेळी फडणवीस बोलत होते. माथाडी कामगारांना घर मिळण्यासाठी पुढाकार घेऊ, महामंडळाचा नामविस्तार मराठा क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ  असा करू असं आश्वासन...

September 16, 2024 2:45 PM

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी धार्मिक तेढ निर्माण केल्याचा काँग्रेसचा आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकातल्या गणपती विसर्जनाबाबत खोटी बातमी पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसनं केला आहे. याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करत, प्रदेश काँग्रेसच्या विधि विभागाचे अध्यक्ष ॲड. रविप्रकाश जाधव यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.    भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी या संदर्भात खोटी माहिती प्रसारित करून समाजात तेढ आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचा, तसंच सामाजिक...

September 13, 2024 6:58 PM

‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेसाठी नोंदणी वेबपोर्टलचे उद्घाटन

'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या संकेतस्थळाचं लोकार्पण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झालं. आगामी काळात सौर कृषिपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल, असं फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं. योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं आणि भित्तीपत्रकाचं प्रकाशनही फडणवीस यांच्या हस्ते यावेळी झालं. काही लाभार्थी शेतकऱ्यांशी फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ...

September 11, 2024 9:31 AM

धुळे जिल्हा लवकरच औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जाईल-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या औद्योगिक भागात आता लवकरच धुळ्याचे नाव असेल,असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल धुळ्यात व्यक्त केला. धुळे जिल्ह्यातल्या जामफळ धरणावरून शिंदखेडा तालुक्यातल्या 54 गावांना शेतीसाठी थेट वाहिनीद्वारे पाणी पुरवठा करणार्‍या 'बंदिस्त नळ वितरण प्रणाली' या योजनेचा शुभारंभ काल फडवणीस यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. सहा राष्ट्रीय महामार्ग, मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग आणि सुलवाडे-जामफळ-कनोली जल प्रकल्पामुळे सिंचनाची सोय या सर्व सुविधा इथे उपलब्ध होत असल्याचा आनंद फडणव...

September 10, 2024 6:38 PM

बावनकुळे यांना अडकवण्यासाठी गोष्टीचं राजकारण करू नये – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या मालकीच्या कारमुळे काल मध्यरात्री नागपुरात काही गाड्यांना झालेल्या अपघाताबाबत पोलीस योग्य तो तपास करत आहेत. पण केवळ बावनकुळे यांना  अडकवण्यासाठी या गोष्टीचं राजकारण करणं योग्य नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. अनिल देशमुख यांच्यावर होत असलेली कारवाई ही सीबीआय करत आहे, असं त्यांनी सांगितलं.

September 9, 2024 8:09 PM

महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरणमधल्या कंत्राटी कामगारांना १९ टक्के वेतनवाढ

महाराष्ट्राच्या विविध भागातल्या महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनात 19 टक्के वाढ करण्याची घोषणा ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केली. ही वाढ मार्च 2024 पासून लागू केली आहे.  या कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत सह्यादी अतिथीगृहात झालेल्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे आता राज्यातल्या ऊर्जा विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचं वेतन हे अन्य राज्यांमधल्या कंत्राटी ...

September 7, 2024 11:58 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुती सरकारचे प्रमुख असून त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊ”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. “मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याचा अधिकार आपल्याला नसून हा निर्णय भाजपाचं संसदीय मंडळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मिळून घेतील. हा निर्णय निवडणुकीच्या आधी घ्यायचा की नंतर हे तेच ठरवतील, असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत कसलाही संभ्रम नाही”, असंही...

September 6, 2024 7:20 PM

एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुती सरकारचे प्रमुख असून त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊ, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे. नागपूरमधे ते वार्ताहरांशी बोलत होते. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याचा अधिकार आपल्याला नसून तो हा निर्णय भाजपाचं संसदीय मंडळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मिळून घेतील. हा निर्णय निवडणुकीच्या आधी घ्यायचा की नंतर हे तेच ठरवतील, असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत कसलाही संभ्रम नाही, असंही त्...

September 4, 2024 7:28 PM

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

लातूर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणनवीस यांनी आज पाहणी केली. उदगीर तालुक्यात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला.   पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं असून योग्य ती मदत दिली जाईल असं यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं.केंद्रीय रा...

September 1, 2024 8:20 PM

विधी आणि न्याय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढणं ही सकारात्मक बाब – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधी आणि न्याय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढणं ही सकारात्मक बाब असून, भारतीय न्याय व्यवस्था अधिक सृदृढ आणि बळकट असल्याचं ते द्योतक आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतीगृहाचं उद्घाटन आज फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.   मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील, न्यायमूर्ती रविंद्र घुगे, राज्याचे महा अधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु ए. लक्ष्मीनाथ,...