June 29, 2024 7:25 PM
जनतेला विश्वासात घेऊन राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाची पुढची प्रक्रिया केली जाईल – मंत्री दादा भुसे
जनतेला विश्वासात घेऊन आणि स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधूनच राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाची पुढची प्रक्रिया केली जाईल,अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री दादा भुसे यांनी आज विधानपरिषदेत दिली. या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं सांगत हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी काँग्रेसचे सतेज पाटील यांनी आज लक्षवेधीच्या माध्यमातून केली होती. त्याला भुसे यांनी उत्तर दिलं. शहरं विद्रुप करणाऱ्या बेकायदेशीर जाहिरात फलकांना चाप लावण्यासाठी आवश्यकता भासल्यास कायद्यात बदल केला जाईल, त्यासाठ...