September 8, 2024 2:17 PM

मुंबईत केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षकासह तीन जणांना लाचखोरी प्रकरणी अटक

सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागानं मुंबईतल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षक आणि त्याच्या साथीदारांसह तीन जणांना २० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं. मुंबईतल्या सांताक्रूझ इथल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयातले अधिकारी आणि अन्य ८ जणांनी अटक टाळण्यासाठी ६० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली होती. त्यानंतर सीबीआयनं सापळा रचून कारवाई केली. मागणी केलेल्या लाचेपैकी ३० लाख रुपये हवाल्यानं स्वीकारले असल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे. अटक केलेल...

July 18, 2024 10:35 AM

ऑनलाइन ठगांना शेकडो सिमकार्ड पुरवणारी टोळी ठाणे पोलिसांद्वारे गजाआड

शेअर बाजारात गुंतवणुकीचं आमिष दाखवून लोकांना फसविणाऱ्या टोळीला सिमकार्ड पुरवणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर कक्षानं छडा लावून छत्तीसगढमधील अफताब ढेबर याच्यासह तिघांना अटक केल्याची माहिती ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. यातील चीन आणि दुबईचाही संबंध उघड झाला असून, 779 मोबाइल सिमकार्डसह 23 मोबाइल हस्तगत पोलिसांनी हस्तगत केले.     ऑनलाइन आर्थिक फसवणुकीसाठी सक्रिय टोळ्यांकडून बनावट शेअर ट्रेडिंग ॲप्लिकेशन साइट्स तयार करू...

June 17, 2024 6:49 PM

लातूर : अवैध हत्यारं बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक

लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे विभागानं लातूर-तुळजापूर मार्गावरच्या  बेलकुंड इथून एका तरुणाला अवैध हत्यारं बाळगल्याप्रकरणी अटक केली. या तरुणाकडून पोलिसांनी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस आणि मॅगझिन जप्त केलं असून त्याच्याविरोधात भारतीय हत्या कायद्या अंतर्गंत भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या युवकाला याआधी एका गुन्ह्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेली असून तो जामिनावर बाहेर आला होता.