September 25, 2024 8:05 PM

क्रिकेट फलंदाजी मानांकनात भारताच्या दोन खेळाडूंना पहिल्या दहा खेळाडूत स्थान

कसोटी क्रिकेट फलंदाजी मानांकनात भारताच्या यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत या दोघांनी पहिल्या दहा खेळाडूत स्थान मिळवलं आहे. ७५१ गुणांसह जयस्वालनं पाचवं तर पंतनं ७३१ गुणांसह सहावं स्थान पटकावलं आहे. चेन्नईत बांगलादेशाविरुद्धच्या सामन्यात भारताच्या विजयात या दोघांचा सिंहाचा वाटा होता. 

September 20, 2024 7:16 PM

भारत- बांगलादेशकसोटी सामन्याच्या दिवसअखेर आज भारताची आघाडी

  भारत आणि बांगलादेश या दोन संघांदरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आज दिवसअखेर भारतानं ३०८ धावांची आघाडी घेतली आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दिवस संपला तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात ३ गडी बाद, ८१ धावा झाल्या होत्या. रिषभ पंत आणि शुभमन गिल आज नाबाद राहिल्यानं उद्या फलंदाजीसाठी मैदानात उतरतील.   तत्पूर्वी, भारतानं पहिल्या डावात ३७४ धावा केल्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या बांगलादेशच्या संघाला सर्वबाद, १४९ धावाच करता आल्या. जसप्रीत बुमराहनं चार गड्यांना तं...

September 12, 2024 1:04 PM

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड कसोटी सामन्याचा सलग चौथ्या दिवसाचा खेळही पावसामुळे रद्द

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड दरम्यानच्या एकमेव क्रिकेट कसोटी सामन्याचा आजचा सलग चौथ्या दिवसाचा खेळही पावसामुळे रद्द करावा  लागला. उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडा इथल्या शहीद विजय सिंह पथिक स्टेडियममध्ये आयोजित हा सामना एकही चेंडू टाकल्याविनाच रद्द होण्याची शक्यता असून उद्या सकाळी याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं सामनाधिकारी जवगल श्रीनाथ यांनी सांगितलं. अफगाणिस्तान क्रिकेट मंडळातर्फे होणाऱ्या सामन्यांसाठी ग्रेटर नोएडातलं हे मैदान वापरलं जातं.

August 8, 2024 10:52 AM

भारत – श्रीलंका अंतिम एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव

श्रीलंकेकडून काल ओडीआय मालिकेमद्धे तिसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामाना करावा लागला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून भारतासमोर 249 धावांच आव्हान ठेवलं होतं परंतु 138 धावांमध्येच भारताचं आव्हान संपुष्टात आलं. पहिला सामना बरोबरीत संपल्यानंतर दूसरा सामना श्रीलंकेनं 32 धावांनी जिंकला. 27 वर्षांनंतर श्रीलंकेला भरताविरुद्धची ही मालिका आपल्या नवे करण्यात यश आलं आहे.

August 7, 2024 8:30 PM

तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचं भारतापुढं विजयासाठी २४९ धावांचं आव्हान

श्रीलंकेत कोलंबो इथं सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात, श्रीलंकेनं भारतापुढं विजयासाठी २४९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं निर्धारित ५० षटकात ७ गडी गमावून २४८ धावा केल्या. अविष्का फर्नांडोचं शतक थोडक्यात हुकलं त्यानं ९६ धावा केल्या. कुशल मेंडिस ५९, तर पथुम निशंकानं ४५ धावांचं योगदान दिलं. भारतातर्फे रियान परागनं ३ गडी बाद केले.  

August 5, 2024 12:12 PM

पन्नास षटकांच्या दुसऱ्या सामन्यात यजमान श्रीलंकेची भारतावर मात

भारत आणि श्रीलंका यांच्यात काल झालेल्या 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात श्रीलंकेनं भारताचा 32 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करत विजयासाठी 241 धावाचं लक्ष्य भारतासमोर ठेवलं होतं. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ 208 धावाच करु शकला. श्रीलंकेच्या जेफ्री व्हॅडरसनने भारताचे प्रमुख सहा गडी बाद केले.

August 2, 2024 11:14 AM

भारत आणि श्रीलंका यांच्यात मर्यादित षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना कोलंबोमध्ये होणार

भारत आणि श्रीलंका यांच्यात मर्यादित षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कोलंबोमध्ये होणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या २० षटकांच्या क्रिकेट मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यानंतर ही मालिकाही जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. या मालिकेसाठी रोहित शर्माच्या भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी अडीच वाजतासामना सुरू होईल.

July 30, 2024 11:24 AM

भारत श्रीलंका यांच्यात 20 षटकांचा आज तिसरा क्रिकेट सामना

भारत श्रीलंका यांच्यात 20 षटकांचा तिसरा क्रिकेट सामना आज भारत आणि श्रीलंकेच्या क्रिकेट संघांदरम्यान सुरू असलेल्या टी-ट्वेंटी मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज संध्याकाळी श्रीलंकेतल्या पल्लेकेले मैदानावर खेळला जाणार आहे.   भारतीय संघानं आधीचे दोन सामने जिंकून आघाडी घेतली असल्यानं भारतानं या मालिकेचं विजेतेपद याआधीच निश्चित केलं आहे. आजचा सामना जिंकून या मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे.

July 27, 2024 8:19 PM

भारताविरुद्धच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय

भारत आणि श्रीलंके दरम्यान तीन सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ही मालिका खेळत आहे. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या  १३ षटकांत २ बाद १४६ धावा झाल्या होत्या. सुर्यकुमार यादवं या सामन्यात अर्धशतक केलं.

July 19, 2024 12:12 PM

श्रीलंकेविरुद्ध 20 षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार

श्रीलंकेविरुद्ध आगामी वीस षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. या महिन्याच्या 27 तारखेपासून ही मालिका सुरू होत आहे. दरम्यान, पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या 50 षटकांच्या मालिकेसाठी याच संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश करण्यात आला आहे.   दोन्ही मालिकांमध्ये शुभमन गील संघाचा उपकर्णधार असेल. 20 षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघात यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे , अक्षर पटेल, वॉश...