August 29, 2024 7:48 PM

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल श्रीलंका दौऱ्यासाठी कोलंबो इथं पोहचले

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल दोन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यासाठी  कोलंबो इथं पोहोचले आहेत. भारत श्रीलंका आम मालदीव्ज यांच्या संयुक्त प्रयत्नांतून सुरु झालेल्या कोलंबो सुरक्षा परिषदेच्या तयारीचा ते आढावा घेतील.    दहशतवादाचा सामना करण्यासाठी, पोलीस, कायदा अंमलबजावणी आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रात क्षमतावाढ या विषयावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरची सहावी बैठक गेल्या डिसेंबरमधे मॉरिशस मधे झाली होती. 

August 26, 2024 1:34 PM

भारतीय नौदलाची आयएनएस मुंबई युद्धनौका कोलंबोत दाखल

भारत आणि श्रीलंका यांच्यातील संयुक्त सैन्य अभ्यासासाठी भारतीय नौदलाची आयएनएस मुंबई ही युद्धनौका आज कोलंबोत पोहोचली.  श्रीलंकेच्या नौदलाने या युद्धनौकेचं उत्साहात स्वागत केलं. आयएनएस मुंबई या युद्धनौकेची या वर्षातील ही पहिली श्रीलंका भेट असून भारतीय नौदलाच्या जहाजाची ही आठवी श्रीलंका यात्रा आहे. आपल्या तीन दिवसांच्या या दौऱ्यात आयएनएस मुंबई भारतीय नौसेनेद्वारे संचलित करण्यात येत असलेल्या डॉनिअर जातीच्या विमानांचे सुटे भाग पुरवणार असून ते श्रीलंकेच्या नौैदल अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही देणार आहेत. या ...