August 28, 2024 10:17 AM

देशाच्या कोळसा उत्पादनात यावर्षी ७.१२ टक्के वाढ

देशाच्या एकूण कोळसा उत्पादनात या वर्षी आतापर्यंत 7.12 टक्के इतकी लक्षणीय वाढ नोंदवल्याचं कोळसा मंत्रालयानं काल जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.25 ऑगस्टपर्यंत नोंदवण्यात आलेल्या आर्थिक वर्षात देशाचं एकत्रित कोळसा उत्पादन वाढून 370 दशलक्ष टन झालं आहे, जे गेल्या वर्षी याच कालावधीत 346 दशलक्ष टन इतकं होतं.तसंच कोळशाच्या वितरणातही लक्षणीय वाढ झाली असून यावर्षी 25 ऑगस्टपर्यंतचं वितरण 397 दशलक्ष टनांवर पोहोचलं आहे. मंत्रालयाने पुढे सांगितले की, मागील गेल्या वर्षीच्या 376 दशलक्ष टन वितरणाच्या तुलनेत आत...

August 13, 2024 7:38 PM

कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी केंद्रसरकारची महत्त्वाकांक्षी योजना

देशात कोळसा उत्पादन वाढवण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्रसरकारने आखली आहे. जागतिक पातळीवर खाण उद्योगात कार्यरत कंपन्यांकडे हे काम सोपवण्यात येणार आहे. त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता उपलब्ध होईल असं केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे. या कंपन्या कोळसा उत्खननाबरोबरच पुनर्वसन, भूसंपादन, पर्यावरण विषयक परवानग्या तसंच केंद्र आणि राज्यसरकारांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबरचा समन्वय ही कामं देखील हाताळणार असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे.