July 15, 2024 4:00 PM
महाराष्ट्रात वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
महाराष्ट्र शासनाने वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना केली असून याचं मुख्यालय पंढरपूर इथंच राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरात केली.ते काल पंढरपूरात आषाढी वारीच्या आढावा बैठकीत बोलत होते.यावेळी मंत्री मंडळातले इतर सहकारी आणि अधिकारी उपस्थित होते. पंढरपूर शहराचा सर्वंकष विकास आराखडा त्वरित सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी व्हीआयपी लोकांपेक्षा वारकरी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांनाच प्राधान्य राहील,त्याचप्रमाणे प्रत्येक द...