July 29, 2024 7:13 PM
दिव्यांगांसाठी सुविधा देणारं पुनर्वसन केंद्र सर्व महापालिकांनी सुरू करावं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दिव्यांगांसाठी एकाच छताखाली प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहायता या सर्व सुविधा देणारं पुनर्वसन केंद्र सर्व महापालिकांनी सुरू करावं, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत दिव्यांग कल्याण महामंडळाच्या बैठकीत बोलत होते. दिव्यांगांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देणारी योजना तयार करतानाच, त्यांच्यासाठी कर्जाची मर्यादा ५० हजारावरुन अडीच लाख रुपयांपर्यंत वाढवावी, असे निर्देश त्यांनी दिले. राज्यातल्या दिव्यांगांना यंदाही रोजगार, स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा वाटप करण...