August 6, 2024 8:47 AM

पूरबाधितांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी समूह विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पूरबाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी इमारतींच्या समूह विकासाचे प्रस्ताव सादर करावेत; त्याचबरोबर झोपडपट्टी पुनर्वसन योजना गतीने राबवाव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पुण्यात दिल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आगामी काळात पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी विविध उपाययोजना कराव्यात, तसंच...

August 5, 2024 7:47 PM

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आव्हान देणारी जनहित याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. ही योजना राजकीयदृष्ट्या प्रेरित असून या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होत आहे, असा आरोप करत नवी मुंबईतले सनदी लेखापाल नावेद मुल्ला यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या समोर सुनावणी झाली. सरकारनं कोणती योजना तयार करावी किंवा ती प्राधान्यानं राबवावी ही बाब न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात...

August 4, 2024 7:08 PM

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना

भारतीय हवामान विभागानं पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर धोकादायक भागातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावं, त्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, सैन्याची मदत घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.  तसंच, बाधित लोकांसाठी निवारास्थाने, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातला विसर्ग दिवसा वाढवून पाणीसाठा ६५ टक्क्यांवर आणावा, जेणेकरून रात्रीच्यावेळी पाऊस झाला, तर नदीपात्रात अधिक विसर्ग करावा लागणार ना...

August 4, 2024 9:49 AM

पुण्यात निळ्या पूररेषेतील नागरिकांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुण्यात नुकत्याच आलेल्या पुरामुळे निर्माण झालेली परिस्थिती, वारंवार उद्भवू नये म्हणून, निळ्या पूररेषेतील नागरिकांचं,कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका आणि जलसंपदा विभाग यांनी समन्वयानं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबतचा तात्पुरता उपाय म्हणून खडकवासला, एकता नगर, सिंहगड रास्ता इथं पूर संरक्षक मजबूत भिंत बांधण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली असून, याठिकाणी विशेष दर्जा देऊन...

August 2, 2024 7:42 PM

रक्षाबंधनाच्या सणापूर्वी महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा होणार

रक्षाबंधनाच्या सणापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज सिल्लोड इथं या योजनेच्या लाभार्थी महिलांना प्रमाणपत्रांचं वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. पणनमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. विरोधकांनी या योजनेच्या अंमलबजावणीत अडथळे आणण्याचे प्रयत्न केले तरी, न्यायालय माझ्या बहिणींना न्याय देईल,असा विश्...

July 31, 2024 7:04 PM

महाराष्ट्र शासनाचा टोयोटा किर्लोस्करसमवेत सामंजस्य करार

राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात छत्रपती संभाजीनगर इथं टोयोटा किर्लोस्करच्या प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथे या प्रकल्पातून इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्सचे उत्पादन होणार आहे. टोयोटा किर्लोस्करच्या प्रकल्पामुळे भारतातल्या मोटार वाहन निर्मिती उद्योगात देखील क्रांती येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. या प्रकल्पातून इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्सचे उत्पादन होणार असून यासाठी २० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्र...

July 31, 2024 8:40 PM

जपानने राज्यात उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असून अनेक जपानी कंपन्या राज्यात चांगलं काम करत आहेत. जपानने भविष्यात देखील राज्यात उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.   जपानचे नवनियुक्त कॉन्सुलेट जनरल यागी कोजी यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. भारत आणि जपान हे आशिया खंडातले महत्वाचे देश असून दोन्ही देशांचे संबंध खूप जुने असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. जपानी कंपन्यांनी मुंबईच्या प...

July 30, 2024 8:04 PM

कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचं केंद्र स्थापन होणार…

कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचं केंद्र स्थापन करण्यासाठी राज्य शासन आणि एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड यांच्यात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार, तसंच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीला प्रशिक्षण केंद्रासाठी पुण्यातल्या शासकीय दूरशिक्षण तंत्र निकेतन संस्थेची जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या सामंजस्य कराराचा लाभ राज्यातील युवकांना देशात आणि प...

July 30, 2024 7:23 PM

८१ हजार कोटी रूपये गुंतवणुकीच्या सात प्रकल्पांना मंजुरी

उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीनं राज्यात ८१ हजार कोटी रूपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे कोकण, मराठवाडा, विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असून, राज्यात सुमारे २० हजार जणांसाठी प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, तसंच उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते.

July 30, 2024 8:56 PM

सरकारी वसतीगृहं आणि आश्रमशाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात भरीव वाढ

राज्यातली विविध विभागांची वसतीगृहं आणि आश्रमशाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं. आदिम जमातीतल्या कुटुंबांसाठी आवास योजना राबवण्यासह आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज द्यायलाही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. राज्यातल्या यंत्रमाग सहकारी संस्थांना राज्य सरकारकडून अर्थसहाय्य द्यायलाही आजच्या बैठकीत मान्यता मिळाली.   राज्य मंत्रिमंडळातील निर्णय :    • विविध विभ...