August 20, 2024 8:22 AM

१ कोटी ४ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचा निधी जमा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या एक कोटी चार लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचा निधी जमा करण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुंबईत काल मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यभरातून सुमारे एक हजार महिला मुख्यमंत्री शिंदे यांना ओवाळण्यासाठी आणि राखी बांधण्यासाठी आल्या होत्या. महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे लाभार्थ्यांशिवाय अन्य कुणालाही काढता येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट...

August 19, 2024 1:44 PM

प्रो गोविंदा लीग स्पर्धेच्या माध्यमातून दहीहंडीचा खेळ जगभरात पोहोचत असल्याचा आनंद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रो गोविंदा लीग स्पर्धेच्या माध्यमातून दहीहंडीचा खेळ जगभरात पोहोचतो आहे, याचा आनंद असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते वरळी इथं बोलत होते. खेळात स्पर्धा असावी, पण ती जीवघेणी असता कामा नये, असं सांगून अपघातमुक्त दहीहंडी साजरी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. या खेळाला १०० वर्षांची परंपरा आहे, स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा खेळ खेळला जातो आणि आता याचा समावेश साहसी खेळांमध्ये करण्यात आला आहे, असंही शिंदे यांनी नमूद केलं. प्रो गोविंदा लीग स्...

August 19, 2024 11:04 AM

सातारा जिल्ह्यात राज्यातल्या पहिल्या सौरग्रामचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सातारा जिल्हयात पाटण तालुक्यातल्या मान्याचीवाडी या राज्यातल्या पहिल्या सौरग्रामचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. या गावात महावितरणच्या वतीने शंभर टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना, मागेल त्यांना सौर कृषीपंप योजना, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी आणि घरगुती वीजग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

August 18, 2024 10:00 AM

राज्यात कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा राखण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन

नाशिक शहरातील काही भागांमध्ये काल निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांना दक्षता घेण्याचं आवाहन केलं आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या तत्पर कारवाई मुळं परिस्थिती आटोक्यात आली असली तरी अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी सर्वांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

August 17, 2024 8:33 PM

लाडकी बहीण योजनेसाठी वर्षभराची आर्थिक तरतूद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी वर्षभराची आर्थिक तरतूद केलेली आहे. महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्याची शासनाची इच्छा असून त्यांच्या विकासाच्या योजना राबविण्यासाठी हात आखडता घेणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी हस्तांतरणाची औपचारिक सुरुवात करण्यासाठी पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महिलांना योजनेचे अर्ज भरण्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत आहे. अर्ज भरल्यानंतर त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याची एकत्रित रक्कम त्यांच्या बँक खात्यावर ज...

August 17, 2024 3:36 PM

लाडकी बहीण योजनेच्या निधी हस्तांतरणाला पुण्यात औपचारिक प्रारंभ

राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम आज पुण्यात बालेवाडी इथल्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, तसंच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अन्य मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राज्यातील 15 हजाराहून अधिक लाभार्थी प्रातिनिधिक स्वरुपात या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1 हजार 500 रुपयांचा लाभ देण्यात येत असून ...

August 17, 2024 10:20 AM

महिला बचतगट आणि महिला उद्योजकांच्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यातील महिला बचतगट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप विकसित करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात याबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यासाठी उमेद, राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान-एनयुएलएम, महिला आर्थिक विकास महामंडळ-माविम यांनी एकत्रित येऊन एक व्यासपीठ निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.   शहरांमध्ये बचतगटांची संख्...

August 16, 2024 8:50 PM

महिला बचतगटांच्या उत्पादनांना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील महिला बचतगट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीयस्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप तयार करावं. शहरांमध्ये बचतगटांची संख्या वाढवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

August 14, 2024 10:35 AM

लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत, यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ, महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काल जळगाव इथं महिला सक्षमीकरण मेळाव्यात ते बोलत होते. लाडकी बहीण योजनेबरोबर राज्यातल्या विकास कामांना खीळ न बसू देता ते अविरतपणे चालू ठेवण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

August 13, 2024 6:13 PM

नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधक १ हजार ९५० कामांना मंजुरी

नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी प्रभावी उपायोयजना करण्यासाठी २ हजार ७६६ कोटी रुपये खर्चाच्या एकूण १ हजार ९५० कामांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं आज मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.  दरड - वीज कोसळणे, पूर, यापासून संरक्षणासाठी भिंत, पुलांचं बांधकाम, नाला खोलीकरण, या कामांचा यात समावेश आहे. मंत्रालयातलं राज्य आपत्ती प्रतिसाद केंद्र अद्ययावत करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. राज्यातले सर्व जिल्हाधिकारी कक्ष या केंद्राशी जोडले जातील. तसंच प्रत...