September 13, 2024 10:55 AM

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. यासंदर्भात काल छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अनेक अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बायोमेडिकल वेस्ट प्रकल्पाचं भूमिपूजन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातल्या तारांगणाचं उद्घाटन, विविध रस्ते तसंच विकेंद्रित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचं ई भूमिपूजन होणार...

September 11, 2024 6:14 PM

राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या धुलाई आणि चकाकी भत्त्यात वाढ

राष्ट्रीय छात्र सेना योजनेसाठी राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या धुलाई आणि चकाकी भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. माध्यमिक,उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी या योजनेत सहभागी होत असतात. या सेनेच्या कनिष्ठ विभागातल्या छात्र सैनिकांना ८ महिन्यांसाठी आणि वरिष्ठ विभागातल्या छात्र सैनिकांना ६ महिन्यांसाठी ३० रुपयांवरून ४१ रुपये  दर महिना इतकी वाढ करायला शासनानं मंजुरी दिली आहे.

September 11, 2024 3:50 PM

मुंबई महानगर प्रदेशाला विकासाचे क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

मुंबई महानगर प्रदेशाला विकासाचे क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी नीती आयोगानं दिलेल्या शिफारशीची अंमलबजावणीसाठी राज्य सरकारनं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या संदर्भातील अध्यादेश काल राज्य सरकारनं जारी केला.     मुंबई आणि महानगर परिसराचं सध्याचं उत्पादन १४० अब्ज डॉलर इतकं असून २०३० पर्यंत हे उत्पादन ३०० अब्ज डॉलर्स इतकं करण्याचं उद्दिष्ट्य या समितीपुढे ठेवलं आहे. या समितीत मुख्य सचिवांसह २२ सदस्य आहेत. नीती आयोगानं केलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणार आहे. ...

September 11, 2024 3:14 PM

राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची बदनामी करतात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकसभेतले विरोधी पक्षनेते, लोकप्रतिनिधी राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची, आणि इथल्या नागरिकांची बदनामी करतात, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आरक्षण संपवण्याचा मनसुबा राहुल गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केला आहे. मात्र, शिवसेना आणि महायुतीतले सहकारी पक्ष आरक्षणाच्या बाजूने असून, आम्ही आरक्षण संपवू देणार नाही, असं त्यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे.   तर, राहुल गांधी नेहमीच देशविरोधी विधानं करत असतात. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी र...

September 11, 2024 9:07 AM

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी कुटुंब भेट अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी राज्यभरात लाभार्थी कुटुंब भेट अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता दररोज 15 कुटुंबांची भेट घेऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही, हे तपासून पाहील आणि, हा लाभ मिळाला नसेल, तर संबंधित कुटुंबाला मार्गदर्शन करून अडचणी दूर करेल, असं शिंदे यांनी सांगितलं.

September 10, 2024 6:48 PM

राज्यात लाभार्थी कुटुंब भेट अभियानाची सुरुवात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी राज्यभरात  लाभार्थी कुटुंब भेट अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. राज्यात महायुतीला विजयी करण्यासाठी शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता दररोज १५ कुटुंबांची भेट घेऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही, हे तपासून तो मिळालेला नसल्यास याबाबतच्या अडचणी दूर करेल, त्या कुटुंबाला मार्गदर्शन करेल, माहिती देईल, असं शिंदे यांनी ठाण्यात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.

September 9, 2024 6:58 PM

नागपूर इथल्या मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावलं उचलण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नागपूर इथल्या मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावलं उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली.  मिहान प्रकल्पांतर्गत विकसित भूखंडासाठी आकारण्यात येणारं शुल्क योग्य असावं तसंच प्रकल्पाच्या निधीसाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव बैठकीसमोर सादर करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. मिहान परिसरातल्या ग्रामपंचायत क्षेत्रात बांधण्यात आलेली व्यापारी संकुलं ही...

September 9, 2024 3:33 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी घेतले गणरायाचे दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशीष शेलार, भाजपा नेते रावसाहेब दानवे आणि इतर यावेळी उपस्थित होते. त्यानंतर शहा यांनी मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. तसंच वांद्रे पश्चिम इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचं दर्शन घेऊन पूजा केली. गृहमंत्री...

September 8, 2024 7:03 PM

राज्य सरकारनं जनहिताचे निर्णय घेतले असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

आपल्या सरकारनं गेल्या दोन वर्षांत घेतलेले ६०० निर्णय सर्व समाजघटकांसाठी होते, मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लोकप्रियतेमुळं त्यांची फारशी चर्चा होत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली. सरकारनं ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, महिला, युवांसाठी आणलेल्या योजनांचा पुनरुच्चार करून आपल्या सरकारचे हात अधिक बळकट करण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं.   देवाची आळंदी इथं झालेल्या वारकरी संतपूजन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ...

September 6, 2024 7:20 PM

एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुती सरकारचे प्रमुख असून त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊ, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे. नागपूरमधे ते वार्ताहरांशी बोलत होते. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याचा अधिकार आपल्याला नसून तो हा निर्णय भाजपाचं संसदीय मंडळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मिळून घेतील. हा निर्णय निवडणुकीच्या आधी घ्यायचा की नंतर हे तेच ठरवतील, असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत कसलाही संभ्रम नाही, असंही त्...