September 25, 2024 8:23 PM

सेमीकंडक्टर क्षेत्रातील गुंतवणूकीमुळे महाराष्ट्र उद्योगस्नेही राज्य झालं आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल असून राज्यात सेमीकंडक्टर क्षेत्रातही मोठी गुंतवणूक होत आहे आणि यामुळे महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य झालं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. इंडिया टुडे कॉनक्लेव्ह २०२४ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेण्यात आली. दावोसमध्ये झालेली गुंतवणूक, सौरऊर्जा, सेमीकंडक्टर इत्यादी क्षेत्रांमध्ये वाढती गुंतवणूक यामुळे उद्योजकांचा विश्वास वाढत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचं जाळं तया...

September 23, 2024 2:17 PM

राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातल्या विविध प्रश्नांवर  जवळपास ३० मिनिटं चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत विधानसभा निवडणूक विशेषत: मुंबईतल्या काही मतदारसंघांच्या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहीती आहे.

September 22, 2024 8:36 PM

नवी मुंबईत कोळी बांधवांनी बांधलेल्या घरांबाबत लवकरच अधिसूचना जारी होणार – मुख्यमंत्री शिंदे

नवी मुंबईत कोळी बांधवांनी गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल असं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईतल्या ऐरोली इथं उभारण्यात येणाऱ्या कोळी भवनाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोळी भवनाचं भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते. कोळी बांधव हे भूमिपुत्र असल्यामुळे त्यांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं जाईल असंही ते म्हणाले. राज्यात जे प्रकल्प होत आहेत त्यामध्ये कोळी बांधवांच अस्तित्व नाकारलं जाणार नाही, असं आश्वास...

September 22, 2024 7:11 PM

मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भंतेजींसाठी चिवरदान, धम्मदान आणि भोजनाचा कार्यक्रम

वर्षावास या पवित्र महिन्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भंतेजींसाठी चिवरदान, धम्मदान आणि भोजनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला राज्यभरातून भिक्षु महासंघाचे भंतेजी आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर सामूहिक प्रार्थना झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते चिवरदान, वस्त्रदान करण्यात आलं. ऑल इंडिया भिक्षु संघाचे महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष भदंत ...

September 21, 2024 7:56 PM

सरकारनं पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केल्यामुळेच राज्यात उद्योग आले – मुख्यमंत्री

सरकारनं पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केले आहेत. यामुळंच राज्यात उद्योग आले. अनेक क्षेत्रात आपण प्रगती केली, त्यामुळे राज्य परकीय गुंतवणूक तसंच जीडीपीमध्ये पहिल्या क्रमांकाचं ठरलं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते आज ठाण्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रातील ५२ टक्के गुंतवणूक मोठी उपलब्धी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

September 18, 2024 6:59 PM

राज्यातल्या पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन

उद्योजकांना सर्व सुविधा पुरवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून हे राज्य आता उद्योगस्नेही झालं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात उद्योग क्षेत्राला रेड कार्पेट सुविधा तसंच एक खिडकी योजना असल्यामुळे राज्यात उद्योग क्षेत्र विकसित होत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्...

September 18, 2024 12:28 PM

जागतिक कृषी मंचाच्यावतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान होणार

पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाबद्दल जागतिक कृषी मंचाच्या वतीनं आज त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही २० देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मानित केलं जाणार आहे.

September 16, 2024 2:45 PM

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी धार्मिक तेढ निर्माण केल्याचा काँग्रेसचा आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकातल्या गणपती विसर्जनाबाबत खोटी बातमी पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसनं केला आहे. याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करत, प्रदेश काँग्रेसच्या विधि विभागाचे अध्यक्ष ॲड. रविप्रकाश जाधव यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.    भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी या संदर्भात खोटी माहिती प्रसारित करून समाजात तेढ आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचा, तसंच सामाजिक...

September 14, 2024 7:22 PM

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ

शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठीची मुदत १७ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी या तारखेपर्यंत www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असं आवाहन शासनानं केलं आहे.   राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत सुरू केलेल्या या उपक्रमात प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक, तर शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे एक, अशा पद्धतीनं एकंदर ५० हजार योजनादूतांची निवड सहा महिन्यां...

September 14, 2024 8:34 PM

महायुतीचं सरकार महिला, शेतकरी, युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

महायुतीचं सरकार महिला, शेतकरी, युवक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. धाराशिव जिल्ह्यात परांडा इथं मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमात आज ते बोलत होते. शासनानं सुरू केलेली लाडकी बहिण योजना यशस्वी झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आपण एकसंघपणे महिलांच्या कल्याणासाठी काम करत असल्याचं ते म्हणाले. ज्या महिलांच्या खात्यात अद्याप योजनेचे पैसे जमा झाले नाहीत, ते येत्या ३० सप्टेंबर पूर्वी जमा करण्याचं ...