September 7, 2024 3:17 PM

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असणाऱ्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचं आगमन भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या आजच्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये मोठ्या उत्साहात झालं. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असलेला हा अनोखा उत्सव अनुभवण्यासाठी अनेक परदेशी पर्यटकांचं आगमनही मुंबई - पुण्यात झालं आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सव काळात राज्यात सुमारे ११ हजार कोटी रुपयांहून अधिक व्यापार होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आण...

August 17, 2024 2:53 PM

मैसूरू शहरी विकास प्राधिकरण भूखंड घोटाळा प्रकरणी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांवर खटला सुरू

मैसूरू शहरी विकास प्राधिकरण भूखंड घोटाळा प्रकरणी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी दिली आहे. गेहलोत यांनी २६ जुलै रोजी सिद्धरामय्या यांना कारणे दाखवा नोटिस बजावून, त्यांच्यावर खटला का चालवण्यात येऊ नये, याची कारणं सात दिवसांच्या आत देण्याची सूचना केली होती. कर्नाटक मंत्रिमंडळानं याला विरोध केला होता आणि राज्यपाल घटनात्मक पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता. सिद्धरामय्या यांनी मैसूरू शहरी विकास प्राधिकरणाचे पर्यायी ...

August 17, 2024 10:20 AM

महिला बचतगट आणि महिला उद्योजकांच्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यातील महिला बचतगट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप विकसित करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात याबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यासाठी उमेद, राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान-एनयुएलएम, महिला आर्थिक विकास महामंडळ-माविम यांनी एकत्रित येऊन एक व्यासपीठ निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.   शहरांमध्ये बचतगटांची संख्...

August 4, 2024 1:56 PM

अन्य राज्यातील विद्यार्थ्यांनाही आता आयुर्वेदाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी राज्यात प्रवेश मिळणार

अन्य राज्यातून बी ए एम एस केलेल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मुंबईत काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना पदव्युत्तर प्रवेश नियमांत आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश दिले. या विद्यार्थ्यांना आता राज्याच्या शासकीय आणि खाजग...

August 4, 2024 9:49 AM

पुण्यात निळ्या पूररेषेतील नागरिकांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुण्यात नुकत्याच आलेल्या पुरामुळे निर्माण झालेली परिस्थिती, वारंवार उद्भवू नये म्हणून, निळ्या पूररेषेतील नागरिकांचं,कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका आणि जलसंपदा विभाग यांनी समन्वयानं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबतचा तात्पुरता उपाय म्हणून खडकवासला, एकता नगर, सिंहगड रास्ता इथं पूर संरक्षक मजबूत भिंत बांधण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली असून, याठिकाणी विशेष दर्जा देऊन...

August 3, 2024 7:38 PM

मुंबई महानगरात पोलिसांना पुरेशा सदनिकांसाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई महानगरात पोलिसांना पुरेशा सदनिकांसाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची आज वर्षा निवासस्थानी बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं. वरळी इथल्या पोलीस वसाहतीच्या समस्याही तत्काळ दूर करण्यासाठी आठ दिवसांच्या आत कार्यवाही करावी, अशी सूचना त्यांनी केली. बीडीडी चाळ पुनर्विकसित इमारतीत दुकानदारांना वाढीव जागा कशी दे...