July 26, 2024 8:04 PM

माजी अग्निवीरांना उत्तर प्रदेशच्या पोलीस दलात भरतीसाठी प्राधान्य – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

माजी अग्निवीरांना उत्तर प्रदेशच्या पोलीस दलात आणि प्रादेशिक सशस्त्र प्रोलीस दलात भरतीसाठी प्राधान्य देण्यात येईल असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. अग्निविरांच्या रूपानं देशाला प्रशिक्षित आणि शिस्तशीर सैनिक मिळाल्यानं फायदा होईल असंही ते म्हणाले. गेल्या १० वर्षात संरक्षण क्षेत्रात घडवून आणलेल्या बदलातून सुधारणा घडल्याचं आदित्यनाथ म्हणाले.

July 11, 2024 8:34 PM

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तराई जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांना भेट

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज तराई जिल्ह्यातल्या श्रावस्ती आणि बलरामपूरमधल्या पूरग्रस्त भागांना भेट देऊन पूरग्रस्तांची चौकशी केली. तर सहारनपूर जिल्ह्यामध्ये बचाव आणि मदतकार्यासाठी लष्कराला पाचारण केलं आहे. गररा आणि खन्नौत नद्यांच्या प्रवाहात २६४ हून अधिकजणं अडकले असून १२ जिल्ह्यांतली ६३३ गावं पुराच्या तडाख्यात सापडली आहेत. तसंच हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली असून सुमारे ८ लाख लोक बाधित झाले आहेत.     मैलानी जंक्शन ते गोंडा यांना जोडणारा रेल्वे मार्ग पाण्याखाली गेला असून एल...