September 11, 2024 3:17 PM

चंद्रपुरात विजेच्या धक्क्याने चार ठार, एक जखमी

चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातल्या गणेशपुर इथं विजेचा धक्का बसून चार जण ठार तर एक शेतकरी युवक जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमी युवकावर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. ही घटना वन्य प्राण्यांपासून शेत-पिकाचं रक्षण करण्यासाठी लावलेल्या तारांच्या कुंपणामुळं घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

September 9, 2024 7:06 PM

गडचिरोली आणि चंद्रपूरला आज रेड अलर्ट

गेल्या चोवीस तासात, विदर्भात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर विदर्भात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकण, आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.    हवामान विभागानं मुसळधार पावसामुळं गडचिरोली आणि चंद्रपूरला आज रेड अलर्ट दिला आहे. ...

September 6, 2024 6:50 PM

चंद्रपुरातलं सागवान प्रधानमंत्री कार्यालयासाठी पाठवणार

चंद्रपूर जिल्ह्यातलं सागवान आता प्रधानमंत्री कार्यालयासाठी पाठवलं जाणार आहे.या लाकडापासून  प्रधानमंत्र्यांची खुर्ची आणि टेबल तयार केलं जाणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. बल्लारपूर डेपोमधून सुमारे ३ हजार घनफूट सागवान यासाठी पाठवलं जाणार आहे. यापूर्वीही संसद भवन, भारत मंडपम, राम मंदिरासाठी जिल्ह्यातलं सागवान पाठवलं आहे.

July 20, 2024 2:49 PM

रत्नागिरी आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी

महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस पडत असून हवामान विभागानं रत्नागिरी आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. नागपूर, चंद्रपूर, अमरावतीमध्ये जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाल्यानं चाकरमान्यांची तारांबळ उडाली.