August 30, 2024 6:45 PM

गावांमध्ये नवीन ग्रंथालय मान्यतेचा फेर प्रस्ताव शासनाकडे तातडीनं सादर करावा – मंत्री चंद्रकांत पाटील

दहा हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांच्या नवीन ग्रंथालय मान्यतेचा फेर प्रस्ताव शासनाकडे तातडीनं सादर करावा, अशा सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. जिल्हा ग्रंथालय आणि अन्य ग्रंथालयांच्या विविध मागण्यांसंदर्भात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम सुधारणेसंदर्भातला प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा, तसंच ग्रंथालय अ. ब. क. ड वर्गाचे निकष पूर्ण करणाऱ्या ग्रंथालयांना ऑनलाइन वर्ग बदल करण्याच्या अनुषंगाने...

August 9, 2024 7:26 PM

यवतमाळमध्ये वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीचं लोकार्पण

यवतमाळमध्ये वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीचं लोकार्पण केलं. डबघाईला आलेल्या सूतगिरण्या खाजगी कंपनीला चालवायला देण्याचा निर्णय नवीन वस्त्रोद्योग धोरणात आहे असं त्यांनी सांगितलं. वस्त्रोद्योग मंत्रालयाने राज्यात घोषित केलेले वस्त्रोद्योग प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यात आणण्याबाबत आपण स्थानिक आमदारांशी चर्चा करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

August 6, 2024 6:09 PM

मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षणाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. यासंदर्भात बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकेचं त्यांनी कौतुक केलं.  न्यायालयाच्या निर्णयानुसार ओबीसी आरक्षणात वर्गवारी करण्याची सूचना दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. घटनाबाह्य स्वरूपाचं सरसकट आरक्षण देणं अयोग्य आहे, शाहू महाराजांच्या काळात सुरू झालेल्या आरक्षण प्रणाल...

August 5, 2024 7:16 PM

देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देणार – मंत्री चंद्रकांत पाटील

येणाऱ्या काळात देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देणार आहे. त्यामुळे उत्तमोत्तम कौशल्य असलेली पिढी घडविण्यासाठी शिक्षणावर जास्त खर्च करायचा आहे, असं प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगावमधल्या अंमळनेर इथं केलं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्राचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

July 7, 2024 2:59 PM

सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला पुन्हा उभारी मिळणार – उद्योगमंत्री चंद्रकांत पाटील

ऐतिहासिक वारसा असलेल्या सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला पुन्हा उभारी देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून उपाययोजना आखण्याचं, आश्वासन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. पाटील यांनी काल सोलापूरच्या जिल्हा नियोजन मंडळासोबत बैठक घेतली, त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते.

June 19, 2024 7:52 PM

पालखीमार्गावरची कामं वेळेत पूर्ण करण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना

पायी पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पालखीमार्गावरची सगळी कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी जास्तीचे कामगार लावावेत, अशा सूचना सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. आषाढी वारी पूर्व नियोजनाबाबत सोलापुरातल्या नियोजन भवन इथल्या बैठकीत ते बोलत होते.   आषाढी वारी पालखी सोहळ्यात पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा, रिंगण सोहळा या ठिकाणी पाणी, आरोग्य, स्वच्छतेच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, यासाठी योग्य दक्षता घेऊन प्रत्येक विभागांनं नियोजन करा...

June 19, 2024 7:00 PM

सोलापुरच्या २५० कोटीच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला मान्यता

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याच्या २५० कोटीच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला मान्यता दिली. त्यानुसार जल, कृषी, धार्मिक आणि वाइन उद्योगाला चालना दिली जाणार आहे. तसंच या प्रकल्पांतर्गत उजनी धरण परिसरात पाटबंधारे विभागाच्या जागेवर मोठा प्रेक्षागृह उभारलं जाणार आहे.