July 21, 2024 10:42 AM

नीट परीक्षा प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणात आणखी तीन आरोपींना सीबीआयकडून अटक

केंद्रीय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिकाफुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं आणखी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. यापैकी दोघे राजस्थानच्या भरतपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच मे रोजी झालेल्या परीक्षेच्या दिवशी या दोघा आरोपींच्या उपस्थितीची तांत्रिक पुष्टी करण्यात आली आहे. तर अटक करण्यात आलेली तिसरी व्यक्ती ही मुख्य सुत्रधाराचा मुख्य सहकारी आहे.

July 18, 2024 8:16 PM

नीट-युजी पेपरफुटी प्रकरण : एम्स-पटणा संस्थेचे चार विद्यार्थी सीबीआयच्या ताब्यात

नीट-युजी प्रवेश परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज एम्स-पटणा या संस्थेच्या चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. हे विद्यार्थी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाचे असल्याचं एम्स-पटणाचे  कार्यकारी संचालक डॉ. जी. के पाल यांनी सांगितलं.      या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यापूर्वी सीबीआयनं आपल्याला आगाऊ सूचना दिली होती, तसंच आपल्या संस्थेनं तपास यंत्रणेला सहकार्य केलं अशी माहिती त्यांनी दिली. सीबीआयनं या विद्यार्थ्यांचे लॅपटॉप जप्त केले असून त्यांच्या खोल्या सील केल्या आहेत. तसंच त्य...

July 16, 2024 7:52 PM

नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी दोन आरोपींना  पाटणा इथून आज अटक

सीबीआय, अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी दोन आरोपींना  पाटणा इथून आज अटक केली आहे. हजारीबाग इथल्या राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या कार्यालयातून नीट परीक्षेचा पेपर चोरल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 14 आरोपींना अटक केली आहे. सीबीआय आणि विविध राज्याचे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत

July 12, 2024 1:05 PM

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाचा आरोपी एन. गंगाधरन याच्या कोठडीत १५ जुलै पर्यंत वाढ

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय कोठडीत असलेला आरोपी एन. गंगाधरन याच्या कोठडीत लातूरच्या न्यायालयानं आणखी चार दिवसांची वाढ केली आहे. त्याची कोठडी काल संपल्यानं त्याला न्यायालयात हजर केलं होतं.  दरम्यान, या प्रकरणी लातूरमध्ये गुन्हा दाखल असलेला ईरंना कोनगलवार हा अद्याप फरार असून त्याला अटक करण्याचं मोठं आवाहन सीबीआयपुढं आहे.

July 12, 2024 12:12 PM

नीट परीक्षा पेपरफूटी प्रकरणाच्या मुख्य आरोपीला सीबीआयनं केलं अटक

नीट परीक्षेतील पेपरफूटी प्रकरणी केंद्रीय तपास पथक-सीबीआयनं राकेश रंजन उर्फ रॉकी या व्यक्तीला अटक केली आहे. पेपरफूटी प्रकरणात तो मुख्य सुत्राधार असून त्याला दहा दिवसांची सीबीआय कोठडीत पाठवलं आहे. राकेश रंजन हा पेपरफूटीप्रकरणातील प्रमुख आरोपी संजीव मुखिया याचा जवळचा साथीदार आहे. मुखिया हा फरार असून त्याचा ठावठिकाणा राकेश रंजनकडून मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी तपास यंत्रणेनं झारखंडच्या हजारीबाग इथल्या ओएसिस शाळेचे मुख्याध्यापक अहसानुल हक आणि उपमुख्याध्यापक इम्तियाज यांच्यासह...

July 1, 2024 3:44 PM

नीट युजी परीक्षेतल्या गैरप्रकारांसंदर्भात गुजरातमधे एका खासगी शाळेच्या मालकाला अटक

नीट युजी परीक्षेतल्या गैरप्रकारांसंदर्भात सीबीआयने गुजरातमधे एका खासगी शाळेच्या मालकाला अटक केली आहे. ५ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचं केंद्र या शाळेतही होतं. गुजरात पोलिसांनी यापूर्वी ५ जणांना अटक केली असून नीट परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी किमान २७ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सीबीआयने चौकशी हातात घेतल्यावर या अरोपींचा ताबा मागितला आहे.

June 30, 2024 8:11 PM

नीट पेपरफुटीप्रकरणी बिहारमधल्या बेऊर कारागृहातल्या आरोपींची सीबीआय चौकशी

नीट यूजी परीक्षेतल्या कथित पेपरफुटीप्रकरणी सीबीआयनं आज बिहारमधल्या बेऊर कारागृहातल्या आरोपींची चौकशी केली. बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं इतर गुन्ह्यात अटक केलेल्या तेरा आरोपींची चौकशीही सीबीआनीयनं केली आहे. पेपरफुटीप्रकरणी बिहार आणि झारखंडमधून आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

June 25, 2024 2:42 PM

NEET-UG परीक्षांमधील गैरप्रकारांचे, बिहार गुजरात आणि राजस्थानमध्येही धागेदोरे

नीट-युजी प्रवेश परीक्षेतल्या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी सीबीआयनं बिहार, गुजरात आणि राजस्थानमधली ५ प्रकरणं हाती घेतली आहेत. सीबीआयनं गुजरात आणि बिहारमध्ये प्रत्येकी एक, तर राजस्थानमध्ये ३ प्रकरणं हाती घेतली असून, महाराष्ट्रातल्या लातूरमधल्या प्रकरणाची चौकशी सीबीआय हाती घेण्याची शक्यता आहे. बिहार पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर पेपरफुटी प्रकरणी असून, इतर ४ प्रकरणं तोतया उमेदवार, तसंच उमेदवार, स्थानिक अधिकारी आणि निरीक्षकांचा समावेश असलेल्या फसवणुकीची असल्याचं ते म्हणाले.

June 24, 2024 7:15 PM

नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचं पथक गुजरातमध्ये दाखल

NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयचं एक पथक गुजरातमधल्या गोध्रा इथं दाखल झालं आहे. गोध्रा इथल्या एका परीक्षा केंद्रावर ५ मे रोजी NEET चा पेपर झाल्यानंतर तीन दिवसांनी तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये परीक्षेतल्या गैरप्रकाराबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला होता. गोध्रा पोलिसांनी या प्रकरणात ३० विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे.   दरम्यान, गुजरातमधल्या पंचमहाल जिल्हा न्यायालयाच्या सत्र ...

June 23, 2024 7:49 PM

नीट यूजी पेपरफुटीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल

नीट यूजी पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने केेलेल्या तक्रारीनंतर सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी देशभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास हाती घेण्यासाठी सीबीआय पावलं उचलत आहे. नीट यूजी परीक्षेतल्या अनियमिततेचं प्रकरण काल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सीबीआयकडे सोपवलं होतं. परीक्षेचं पावित्र्य अबाधित राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. तसंच या प्रकरणात दोषी असणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असं शिक्षण मं...