September 8, 2024 6:12 PM

भाजपच्या नेत्यांवर खोटा गुन्हा दाखल केल्यासंदर्भात सीबीआयची कारवाई

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर खोटा गुन्हा दाखल केल्यासंदर्भात पुण्याचे तत्कालीन पोलीस उपायुक्त, एक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि एक वकील यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी याआधी सीबीआयनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे.

September 8, 2024 2:17 PM

मुंबईत केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षकासह तीन जणांना लाचखोरी प्रकरणी अटक

सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागानं मुंबईतल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षक आणि त्याच्या साथीदारांसह तीन जणांना २० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं. मुंबईतल्या सांताक्रूझ इथल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयातले अधिकारी आणि अन्य ८ जणांनी अटक टाळण्यासाठी ६० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली होती. त्यानंतर सीबीआयनं सापळा रचून कारवाई केली. मागणी केलेल्या लाचेपैकी ३० लाख रुपये हवाल्यानं स्वीकारले असल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे. अटक केलेल...

September 3, 2024 8:16 PM

नाशिक : कृषी आणि विपणन विभागाच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी सीबीआयच्या ताब्यात

केंद्र सरकारच्या कृषी आणि विपणन विभागाच्या नाशिक इथल्या कार्यालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच घेताना आज सीबीआयनं रंगेहाथ पकडलं. या अधिकाऱ्यानं एगमार्कचा परवाना देण्यासाठी तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर सीबीआयनं सापळा रचून ही कारवाई केली. विशाल तळवडकर असं या अटक केलेल्या अधिकाऱ्याचं नाव असून, न्यायालयानं त्याला ५ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

August 25, 2024 7:30 PM

कोलकातातल्या आरजी कर रुग्णालयामधल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचा तपास सुरु

कोलकाता इथल्या आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामधल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं आज सकाळी १५ ठिकाणी भेट देऊन तपासणी केली. सीबीआयचं पथक आरजी करचे माजी प्राचार्य डाॅ संदीप घोष यांची त्यांच्या निवासस्थानी चौकशी करत आहेत. तसंच सीबीआय महाविद्यालयातचे नवे प्राचार्य आणि उपप्राचार्य यांची चौकशी करत आहे. याशिवाय आरजी करचे प्राध्यापक डॉ. देबाशीष सोम, माजी वैद्यकीय अधीक्षक आणि उपप्राचार्य डॉ. संजय वशिष्ठ आणि वैद्यकीय सामुग्री पुरवठादार बिप्लव सिंग यांची देखील सीबीआय त्यांच्या निवासस्थानी चौक...

August 24, 2024 7:55 PM

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात सीबीआय ७ जणांची पॉलीग्राफ चाचणी करणार

कोलकात्यात राधागोविंद कार रुग्णालयातल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी विशेष तपास पथकानं तपासाची कागदपत्र केंद्रीय अन्वेषण संस्थेकडे सुपूर्द केली असून सीबीआय ७ जणांची पॉलीग्राफ चाचणी करणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांचा त्यात समावेश आहे. सिएलदा न्यायालयानं दिली आहे. आतापर्यंत याप्रकरणी अटक झालेला एकमेव संशयित आरोपी संजय राय, तसंच घटनेच्या आधी  पीडितेबरोबर असलेले ४ डॉक्टर यांच्याही पॉलिग्राफ चाचण्या होणार आहेत. दरम्यान संजय राय ला काल १४ दिवसांची कोठडी काल देण्यात आली.  

August 23, 2024 8:10 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी सीबीआयला मंजुरी

दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी आवश्यक मंजुरी सीबीआयला आज मिळाली. केजरीवाल यांच्याविरुद्ध सीबीआयनं एक आरोपपत्रही दाखल केलं आहे. त्याची सुनावणी येत्या २७ तारखेला दिल्लीच्या रोऊज अॅवेन्यू न्यायालयात होणार आहे.  दरम्यान आपल्या अटकेला आव्हान देणाऱ्या, तसंच सीबीआयनं दाखल केलेल्या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी केजरीवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं तहकूब केली आहे. या याचिकेवर उत्तर देण्यासाठी न्यायालया...

August 22, 2024 3:26 PM

कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्येप्रकरणी सीबीआय आणि कोलकाता पोलिसांकडून सर्वोच्च न्यायालयासमोर स्थिती अहवाल सादर

कोलकाता इथल्या आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयलामधील निवासी डॉक्टरवर कथित बलात्कार आणि हत्येप्रकरणी सीबीआयनं आणि कोलकाता पोलिसांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर स्थिती अहवाल सादर केला. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी आंदोलक डॉक्टरांना कामावर परत येण्याचं आवाहन केलं आहे. या आंदोलनाचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो असं न्यायमूर्तींनी म्हटलं आहे. डॉक्टरांच्या विविध संघटनांनी या प्रकरणी हस्तक्षेप करण्यासाठी...

August 19, 2024 8:36 PM

लाच आणि भ्रष्टाचार प्रकरणी नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या व्यवस्थापकासह चौघांना सीबीआयकडून अटक

लाच आणि भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयनं मध्य प्रदेशातल्या सिंगरौली इथल्या नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड- NCL च्या व्यवस्थापकासह चौघाजणांना अटक केली. व्यवस्थापकाच्या घराची झडती घेतली असता, सुमारे चार कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली.  NCL साठी काम करणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांकडून ही रक्कम व्यवस्थापकानं लाच म्हणून घेतल्याची माहिती सीबीआयनं दिली.   सीबीआयनं अटक झालेल्या आरोपींपैकी एकजण मध्य प्रदेशात फार्म चालवतो, तसंच तो विविध कंत्राटदार,व्यापारी आणि NCL च्या अनेक अधिकाऱ्यांसाठी लाच घेण्यासाठी मध्...

August 18, 2024 12:35 PM

कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात सीबीआय संजय रॉय याची मानसशास्त्रीय चाचणी घेणार

कोलकात्याच्या महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग संशयित आरोपी संजय रॉय याची मानसशास्त्रीय चाचणी आज घेणार आहे. दिल्लीच्या केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या विश्लेषकांचं एक पथक कोलकात्याला पोहोचलं असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, केंद्रीय अन्वेषण विभागानं काल सलग दुसऱ्या दिवशी आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी मुख्याध्यापक डॉ. सुदीप घोष यांची प्रदीर्घ चौकशी केली. आरोग्य सुविधा क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी...

August 2, 2024 3:41 PM

नीट युजी पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं केलं १३ आरोपींच्या विरोधात पहिलं आरोपपत्र दाखल

नीट युजी पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल बिहारमध्ये १३ आरोपींच्या विरोधात पहिलं आरोपपत्र दाखल केलं. या आरोपपत्रात पेपरफुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मनिष प्रकाश, सिकंदर यादवेंदु आणि इतर ११ जणांनर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नीट युजी पेपरफुटी प्रकरणात बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं आंतर राज्य टोळीचा छडा लावला होता. या प्रकरणात आतापर्यंत ४० जणांना अटक झाली असून ते पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणी पुढला तपास सुरु आहे.