July 1, 2024 2:55 PM

यवतमाळ नागपूर महामार्गावर चापरदा गावाजवळ झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू

यवतमाळ नागपूर महामार्गावर चापरदा गावाजवळ झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे ४ च्या सुमारास वेगवान इनोव्हा गाडी आणि ट्रकवर धडकून हा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या इनोव्हा कारमधील प्रवासी पंजाबहून नांदेडच्या गुरुद्वारा साहेब इथे दर्शनासाठी जात होते.  

June 24, 2024 1:01 PM

लोणेरे श्रीवर्धन मार्गावर कार अपघातात ३ जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील लोणेरे श्रीवर्धन मार्गावर काल संध्याकाळी एक भरधाव कार झाडाला आदळून उलटल्यानंतर त्यातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका मुलाचा समावेश आहे, तर एक लहान मुलगा गंभीर जखमी आहे. अन्य दुर्घटनेत अलिबाग तालुक्यातील मुनवली इथं तलावात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. यापैकी एका मुलाच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे.