September 19, 2024 1:40 PM

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या अभ्यास परवान्यांमध्ये कपात करण्याचा कॅनडाचा निर्णय

आपल्या देशातले तात्पुरत्या रहिवाशांच्या संख्येचं व्यवस्थापन व्हावं या हेतूने कॅनडाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या अभ्यास परवान्यांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.   इमिग्रेशन, रिफ्युजीस अँड सिटिझनशिप कॅनडाने काल वार्ताहरांना ही माहिती दिली. पुढच्या वर्षी नवीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अभ्यास परवान्यांमध्ये यंदा पेक्षा १० टक्के कपात केली जाणार आहे. 

June 15, 2024 2:32 PM

टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा कॅनडासोबत सामना

आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि कॅनडा संघांमध्ये सामना होणार आहे. हा सामना फ्लोरिडा इथल्या सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होईल. काल वेस्ट इंडिजच्या लॉडरहिलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि नेपाळ यांच्यात चुरशीचा सामना झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नेपाळवर अवघ्या एका धावेनं विजय मिळवला. तर अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला. चांगल्या धावगतीच्या जोरावर  अमेरिकेने सुपर आठमध्ये प्रवेश केला आहे. अमेरिकेच्या संघांनं पदार...