July 19, 2024 7:48 PM

नागपूर जिल्हा परिषदेच्या १ आणि पंचायत समित्यांच्या ४ जागांसाठी ११ ऑगस्टला पोटनिवडणूक

नागपूर जिल्हा परिषदेच्या एका आणि विविध पंचायत समित्यांच्या चार जागांच्या पोटनिवडणुकांसाठी येत्या ११ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे, असं राज्य निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. २३ ते २९ जुलै या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येतील. ३० जुलै रोजी छाननी होईल. उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हाचं वाटप ५ ऑगस्टला होईल. ११ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. मतमोजणी १२ ऑगस्टला होणार आहे.

July 10, 2024 1:34 PM

देशातल्या सात राज्यांमधल्या १३ विधानसभा मतदारसंघांमधे आज पोटनिवडणुकीसाठी मतदान

देशातल्या सात राज्यांमधल्या तेरा विधानसभा मतदारसंघांमधे आज पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. पश्चिम बंगालमधल्या रायगंज, राणाघाट दक्षिण, बागडा आणि मणिकतला, हिमाचल प्रदेशमधल्या देहरा, हमीरपूर आणि नालागढ तसंच उत्तराखंडमधल्या बद्रीनाथ आणि मंगलौर या मतदारसंघात मतदान होत आहे. तसंच मध्यमप्रदेशमध्ये अमरवाडा, बिहारमध्ये रुपौली, तमिळनाडूमध्ये विक्रवंडी आणि पंजाबमधल्या जालंधर पश्चिम मतदारसंघात मतदान सुरू आहे.