June 28, 2024 5:50 PM

युवकांसाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने’ची घोषणा

युवकांना प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण मिळावं यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने’ची घोषणा या अर्थसंकल्पात झाली. याअंतर्गत दहा लाख युवकांना वर्षभर कामाचं प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्यासाठी दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन राज्य सरकार देईल. शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी 50 हजार युवकांना कार्यप्रशिक्षण सरकार देणार आहे. 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जावाढ, मॉडेल आय.टी.आय, जागतिक कौशल्य केंद्र, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, डेटा सेंटर अशा विविध सं...

June 28, 2024 3:20 PM

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२४ : विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्प सादर

अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष तरतूद   मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची उपमुख्यमंत्र्यांकडून घोषणा. २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देणार. दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांचा निधी राखीव. जुलै २०२४ पासून योजनेची अंमलबजावणी सुरू होणार. १७ शहरात १० हजार महिलांना पिंक  रिक्षा खरेदीसाठी निधी देणार ८० कोटी रुपये राखीव. नोंदणीकृत विवाह करणाऱ्या महिलांना १० हजार रुपयांच्या ऐवजी २५ हजार रुपये अनुदान. २१ लाखांहून अधिक घरांना नळ जोडणी देण्याचे काम प्रगतीपथावर. महिलांना स्वच्छ इंधनास...