July 22, 2024 9:02 PM

सर्व राजकीय पक्षांनी आपली पक्षीय धोरणं बाजूला ठेवून पुढच्या साडे चार वर्षांसाठी स्वतःला देशासाठी समर्पित करावं असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

संसदेत उद्या सादर होणारा अर्थसंकल्प हा अमृत काळातला महत्वाचा अर्थसंकल्प असेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी संसद भवन परिसरात ते बातमीदारांशी बोलत होते. हा अर्थसंकल्प पुढच्या पाच वर्षांची दिशा ठरवणार असून सरकारच्या विकसित भारत संकल्पनेचा पाया घालण्याचं काम याद्वारे होईल. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे, देशात होणाऱ्या गुंतवणुकीमुळे इथं संधीची विपुलता आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. आपण जनतेला दिलेल्या हमीची अंमलबजावणी ...

July 17, 2024 9:48 AM

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं येत्या रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पडावं यासाठी विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.23 जुलै रोजी अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.या अधिवेशानाचं कामकाज 12 ऑगस्टपर्यंत निश्चित करण्यात आलं आहे.

July 7, 2024 12:58 PM

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलैपासून सुरू

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रीजिजू यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलैला लोकसभेत २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. १२ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल. हा अर्थसंकल्प सरकारची दूरगामी धोरणं आणि भविष्यवेधी दृष्टिकोनाचा प्रभावी दस्तऐ...