June 25, 2024 8:05 PM
पुणे पोर्शे प्रकरण : अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहातून सुटका करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहातून तत्काळ सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. बाल न्याय मंडळानं आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला आव्हान देत आरोपीच्या आत्यानं उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर झाल्यानंतर त्याला ताब्यात घेणं बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद यावेळ...