September 25, 2024 3:09 PM

बिहारच्या मारहोरा इथं रेल्वे इंजिन प्रकल्पातून प्रथमच निर्यातीची सुरुवात – रेल्वे मंत्रालय

बिहारच्या मारहोरा इथे सुरू असलेल्या रेल्वे इंजिन प्रकल्पातून प्रथमच निर्यातीची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. वेबटेक लोकोमोटिव्ह प्रायवेट लिमिटेड आणि भारतीय रेल्वे यांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या या प्रकल्पातून आफ्रिकेत रेल्वे इंजिनाची निर्यात करण्यात येईल. पुढच्या वर्षीपासून या इंजिनांची निर्यात सुरू होईल, असंही रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे.

September 22, 2024 1:57 PM

बिहारमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण

बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. सुल्तानगंज आणि रतनपूर स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं या मार्गावरील रेल्वे वाहतूक स्थगित करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून गंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत आहे. गंगा आणि अन्य नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानं पटणा, वैशाली आणि बेगूसराय यांसह १२ जिल्ह्यांत पूर आला आहे. याचा फटका १० लाखांहून अधिक नागरिकांना बसला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल पटणा आणि वैशाली य...

September 20, 2024 1:46 PM

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पूरग्रस्त भागाची केली हवाई पाहणी

बिहार आणि उत्तर प्रदेशात पूरपरिस्थिती कायम असल्यानं सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गंगा नदी परिसरातल्या पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करून या भागात तातडीनं बचाव आणि मदतकार्य सुरु करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. गंगा आणि इतर नद्यांना आलेल्या पूरामुळे पाटणा, बक्सर, वैशाली, बेगुसराय, नालंदा हे जिल्हे जलमय झाले आहेत.    उत्तर प्रदेशात २६ जिल्ह्यांना पूराचा तडाखा बसला असून त्यामुळे सुमारे ५ लाख लोक प्रभावित झाले आहेत. बलिया जिल्ह्यात शरयु नदीच...

August 27, 2024 1:54 PM

बिहारच्या भागलपूर आणि आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचे धक्के

बिहारच्या भागलपूर आणि आजूबाजूच्या परिसरात काल मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.५ मोजण्यात आली. भूकंपाचे केंद्र झारखंडच्या संधाल प्रांतातल्या रामगढ जिल्ह्यात होतं. या भूंकपात कोणतेही नुकसान झाल्याचं वृत्त नाही.

August 12, 2024 1:12 PM

बिहारमधल्या सिद्धेश्वरनाथ मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ७ भाविकांचा मृत्यू

बिहारमधल्या जहानाबाद जिल्ह्यातल्या सिद्धेश्वरनाथ मंदिरात काल मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला असून १६ हून अधिक जण जखमी झाले आहेत. भाविक आणि स्थानिक दुकानदार यांच्यात मध्यरात्री एक वाजता भांडण झाल्यामुळे चेंगराचेंगरी होऊन ही दुर्घटना झाली, असं जहानाबादचे पोलीस निरीक्षक अरविंद प्रताप सिंह यांनी सांगितलं. मंदिराचा परिसर अरुंद असल्यामुळे गर्दी नियंत्रणात आणणं शक्य झालं नाही असं म्हणाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.    मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर &nbsp...

August 2, 2024 11:17 AM

बिहारमध्ये वीज पडल्यामुळे किमान १० जणांचा मृत्यू

बिहारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये, वीज पडल्यामुळे किमान १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सर्वाधिक मृत्यू गया येथे झाले असून, जेहानाबादमध्ये तीन आणि रोहतास जिल्ह्यात दोन मृत्यू झाले आहेत. चालू खरीप हंगामात शेतात काम करणाऱ्या लोकांवर वीज पडल्याने बहुतांश मृत्यू झाले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या दुर्घटनामध्ये झालेल्या जीवितहानी बद्दल शोक व्यक्त केला आहे.  

July 6, 2024 11:34 AM

बिहारमध्ये गेल्या 24 तासात वीज पडून 19 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये गेल्या 24 तासांत वीज पडून 19 जणांचा मृत्यू झाला असून, 7 जण जखमी झाले आहेत. पाऊस सुरू असताना शेतात काम करणाऱ्या आणि झाडाखाली थांबलेल्या लोकांवर वीज पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला.   राज्याच्या उत्तर, आग्नेय आणि दक्षिण मध्यवर्ती भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून पुढील 24 तासांसाठी पिवळा बावटा जारी केला आहे.

June 20, 2024 6:53 PM

बिहारमधलं वाढीव आरक्षण उच्च न्यायालयाकडून रद्दबातल

बिहार सरकारनं मागास, अति मागास, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमधे लागू केलेलं वाढीव आरक्षण पाटणा उच्च न्यायालयानं आज रद्दबातल ठरवलं. सर्वोच्च न्यायालयानं निर्धारित केलेल्या ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत बदल करून बिहार सरकारनं हे आरक्षण ६५ टक्क्यापर्यंत वाढवलं होतं. हे आरक्षण लागू करणाऱ्या बिहार आरक्षण कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिकांवरचा निकाल उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीं के विनोद चंद्रन आणि न्यायमूर्ती हरिश कुमार यांच्या ख...

June 19, 2024 8:49 PM

देशाला २०४७पर्यंत विकसित करण्यात ज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

२०४७ पर्यंत देशाला विकसित करण्यात ज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बिहारमधल्या राजगीर इथं नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारतीय शिक्षण आणि ज्ञान पद्धती मजबूत करुन भारत सुपर पावर बनू शकतो. जगाला भारताची ओळख आणि परंपरेचं दर्शन घडवण्यासाठी नालंदा विद्यापीठ हे उत्तम उदाहरण असल्याचं ते म्हणाले.   शिक्षणाच्या क्षेत्रात जागतिक भागिदारी यामुळं तयार होत असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले. जागतिक ...