August 20, 2024 11:12 AM

इस्रायलची ओलिस ठेवलेल्यांच्या सुटकेच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला मान्यता

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याशी जेरुसलेम इथं तीन तास चर्चा केल्यानंतर इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतान्याहू यांनी हमासनं ओलिस ठेवलेल्या इस्रायलींच्या सुटकेबाबत मध्यस्थी करण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव मान्य केला. इस्रायलच्या सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन ओलिसांच्या सुटकेसाठी मध्यस्थी करण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाशी इस्रायल वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार नेतान्याहू यांच्या कार्यालयानं प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात केला. नेतान्याहू यांनी अमेरिकेच्या प्रस्तावाला पहिल्यांदाच जाहीरर...

June 24, 2024 3:09 PM

हमासला पूर्णपणे सत्ताच्युत करेपर्यंत युद्ध चालूच राहील- बेंजामिन नेतान्याहू

गाझापट्टीतल्या संघर्षाचा जोर ओसरला असला तरी हमासला पूर्णपणे सत्ताच्युत करेपर्यंत युद्ध चालूच राहील, असं इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी जाहीर केलं आहे. दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, इस्राएली फौजा लौकरच लेबनॉन हद्दीवर पाठवल्या जातील. या भागात हिजबुल्लांबरोबर गेले काही दिवस चकमकी वाढल्या आहेत.