September 22, 2024 9:50 AM

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी घनसावंगी तालुक्यात रास्तारोको आंदोलन, बीड आणि धाराशिव जिल्हा बंदला सर्वत्र प्रतिसाद

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचं जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काल घनसावंगी तालुक्यात तीर्थपुरी, बानेगाव, भोगगाव, रामसगाव इथं मराठा समाज बांधवांनी रास्तारोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे तीर्थपुरी मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलकांनी पुकारलेल्या बीड आणि धाराशिव जिल्हा बंदला काल सर्वत्र प्रतिसाद मिळाला. तर लातूर जिल्ह्यातल्या सकल मराठा समाज...

September 4, 2024 5:23 PM

मूलभूत सुविधा मागणीवरून बीड परळी मार्गावर नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन

मूलभूत सुविधा पुरवाव्यात या मागणीवरून बीड परळी मार्गावर नागरिकांनी आज तासभर रास्ता रोको आंदोलन केलं. आंदोलकातल्या एकानं रस्त्यावरच्या खड्ड्यात झोपत तीव्र भावना व्यक्त केल्या.   दरम्यान, खासदार बजरंग सोनवणे यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.तेलगाव नाका परिसरात स्वच्छता करावी तसंच नागरी सुविधा देण्यात याव्यात अशी आंदोलकांची मागणी होती. यावेळी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

August 28, 2024 9:26 AM

एसटी बससाठी विद्यार्थ्यांचे मांजरसुंभा बस स्थानकात आंदोलन

बीड जिल्ह्यात मांजरसुंबा बस स्थानकातून मागील तीन दिवसांपासून एसटी बस येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंदांना सोबत घेऊन काल बस स्थानकात ठिय्या आंदोलन केलं. बस येत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात उपस्थित राहता आलं नाही, विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक आणि आर्थिक ही नुकसान होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. हे आंदोलन होताच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब एसटी बस उपलब्ध करून दिली.

August 26, 2024 3:48 PM

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंचाच्या कुटुंबाचं आत्मदहनाचा प्रयत्न

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एका सरपंचाच्या  कुटुंबानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. गेवराई तालुक्यातल्या रेवकी देवकी ग्रामपंचायती अंतर्गत केलेल्या कामांची ९६ लाखांची देयकं प्रशासनाने रोखली. याची दाद मागण्यासाठी सरपंच शशिकला मस्के यांच्यासह त्यांच्या कुटुंबातल्या अन्य दोघांनी अंगावर डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मस्के कुटुंबाला पुढील  कारवाईसाठी ताब्यात घेतलं आहे.

August 21, 2024 8:10 PM

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे कांदा, कापूस, साेयाबीनसह अन्य प्रश्न साेडवण्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची ग्वाही

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे कांदा, कापूस, साेयाबीनसह अन्य प्रश्न साेडवण्यासाठी बैठक घेतली जाईल तसेच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल, पिक विमा दिला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चाैहान यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ इथं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं उद्घाटन आज चौहान यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बालत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार, राज्याचे कृषी मंत्री धनंजय ...

August 14, 2024 9:03 AM

बीडच्या शेतकऱ्यांचा पीक विमा ३१ ऑगस्टपूर्वी वितरीत करा – कृषीमंत्री धनंजय मुंडे

बीड जिल्ह्यात २०२३-२४ च्या खरीप आणि रब्बी हंगामातल्या उर्वरित २२ कोटी तीन लाख रुपयांचं वितरण विमा कंपनीने कोणतंही कारण न देता ३१ ऑगस्टच्या आत पूर्ण करावे, असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. या वर्षासाठी एकूण ४०० कोटी २४ लाख रुपये पीकविमा आतापर्यंत मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी ३७८ कोटी २१ लाख रुपयांचं वितरण संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्यात आलं आहे.

August 5, 2024 10:22 AM

बीड जिल्ह्यात दूध भेसळीविरोधात कारवाई, १३ हजार ३६८ किलो रासायनिक भुकटी जप्त

बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या कडा इथं काल अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या कारवाईत भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी ११ लाख ८५ हजार ६८ रूपये किंमतीची १३ हजार ३६८ किलो रासायनिक भुकटी जप्त केली. तसंच बीड, अहमदनगर आणि धाराशिव इथं काल विभागातर्फे विविध ठिकाणी धाड टाकण्यात आली. या कारवाईत ६ लाख ८७ हजार ६७२ रुपयांची ६ हजार ९४२ किलो भेसळ जप्त करण्यात आली.