September 4, 2024 1:58 PM

तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सतीश कुमार करुणाकरन आणि शंकर सुब्रमणियन यांचा पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश

तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे सतीश कुमार करुणाकरन आणि शंकर सुब्रमणियन यांनी पुरुष एकेरी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. करुणाकरन याने थायलंडच्या कान्तफोन वांगच्यारोएन याचा २४-२२,२३-२१ असा सरळ गेम मध्ये  पराभव करत ही फेरी गाठली तर दुसऱ्या एका सामन्यात सुब्रमणियन याने ज्योकिम ओल्डरफ याला २१-१२, १९-२१, २१-११ असं नमवलं. दरम्यान, आकर्षि कश्यप, तानिया हेमंत, अनुपमा  उपाध्याय  या तीन महिला बॅडमिंटनपटू स्पर्धेतून बाद झाल्या.

August 22, 2024 1:37 PM

जपान खुली बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या सतीश कुमारचा पुरुष एकेरीच्या सोळाव्या फेरीत प्रवेश

जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सतीश कुमार करुणाकरनने काल योकोहामा इथं पुरुष एकेरीच्या सोळाव्या फेरीत प्रवेश केला. आज सतीशचा सामना जागतिक क्रमवारीत चाळीसाव्या स्थानावर असलेल्या थायलंडच्या कांताफोन वांगचारोएन याच्याशी होईल. भारताच्या किरण जॉर्ज याला मात्र पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत जपानच्या कांता त्सुनेयामाकडून २१-१९, २१-१४ असा पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत बी. सुमीत रेड्डी आणि एन. सिक्की रेड्डी या भारतीय जोडीला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. ऋतुपर्णा पांडा आणि श्वेतपर्णा पांडा ...