September 26, 2024 9:29 AM

बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिस चकमकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून शंका व्यक्त

बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूच्या घटनेला चकमक मानणं शक्य नसल्याचं निरीक्षण, मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या पीठानं काल झालेल्या सुनावणीत हे मत व्यक्त केलं. या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी अपेक्षित आहे, तशी ती होत नसल्याचं दिसलं, तर आम्हाला आदेश काढावा लागेल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

September 24, 2024 8:36 PM

बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू

बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीआयडी अर्थात गुन्हे अन्वेषण विभागानं सुरू केली आहे. याप्रकरणी सीआयडीच्या पथकानं मुंब्रा आणि ठाणे पोलिस स्थानकाला भेट दिली. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद मुंब्रा पोलिसांनी केली आहे. भारतीय न्याय संहिता आणि शस्त्रास्त्र कायदाच्या अंतर्गत पोलिसांनी स्वतंत्र तक्रारींची नोंद केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांची बंदूक हिसकावून अक्षय शिंदेनं गोळीबार केला होता. दरम्यान, जे जे रुग्णालयात आज त्याच शवविच्छेदन झालं.