September 13, 2024 10:18 AM

नीरज चोप्रा आणि अविनाश साबळे डायमंड लीग फायनलमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व

ब्रुसेल्स इथं आजपासून सुरू होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत भारताचं प्रतिनिधित्व पॅरिस ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे करणार आहेत. यंदा डायमंड लीगमधील अलियान्झ मेमोरियल व्हॅन डॅमे स्पर्धेत हे क्रिडापटू विजयासाठी लढत देतील. सध्या 14व्या क्रमांकावर असलेला भारताचा स्टीपलचेसर अविनाश साबळे आज डायमंड लीगच्या अंतिम फेरीत पदार्पण करेल. त्याचा सामना इथिओपियाचे सॅम्युअल फायरवू, गेटनेट वले, केनियाचे आमोस सेरेम आणि अब्राहम किबिवोट यांच्याशी होईल, तर स...

August 6, 2024 10:01 AM

पॅरिस ऑलिम्पिक : भारताच्या अविनाश साबळेची पुरुषांच्या स्टीपलचेस स्पर्धेत अंतिम फेरीत धडक

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अविनाश साबळे याने काल ऐतिहासिक कामगिरी करत पुरुषांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्रातील बीडचा सुपुत्र असलेल्या अविनाशनं काल रात्री झालेली ही शर्यत पाचव्या क्रमांकानं पूर्ण करत ८ मिनिट आणि १५ पूर्णांक ४३ सेकंदांची वेळ दिली आणि अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क केलं. येत्या ८ ऑगस्टला ही अंतिम फेरी होणार आहे.   भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याला मात्र काल कास्य पदकानं हुलकावणी दिली. नेमबाजीमध्येही मिश्र सांघिक प्रकारात महेश्वरी चौहान आणि...

July 8, 2024 1:11 PM

पॅरिस डायमंड लीगमध्ये स्टीपलचेस प्रकारात भारताच्या अविनाश साबळेचा नवा राष्ट्रीय विक्रम

पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झालेला भारतीय धावपटू अविनाश साबळे यानं काल डायमंड लीग स्पर्धेत पुरुषांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला. पॅरिसच्या चार्लेटी मैदानावर झालेल्या स्पर्धेत अविनाशने ८ मिनिटं , ९ सेकंद आणि ९१ मायक्रोसेकंदां मध्ये अंतर पार करत नवा विक्रम प्रस्थापित केला. या विक्रमासह अविनाशला स्टीपलचेस प्रकारात सहावं स्थान मिळवता आलं. जुना राष्ट्रीय विक्रमही अविनाशच्या नावावर नोंदला आहे. दोन वर्षांपूर्वी अविनाशनेच बर्मिंघमच्या राष्ट्रकुल स्पर्धेत स्टीपलचेस प्रकार...