September 10, 2024 12:14 PM

ऑस्ट्रेलिया लहान मुलांना समाज माध्यमांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी समाज माध्यमांसाठी किमान वयाचा कायदा करणार

लहान मुलांना समाज माध्यमांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचं सरकार समाज माध्यमांसाठी किमान वयाचा कायदा करणार आहे. हा कायदा मुलांच्या सुरक्षेची काळजी घेऊन पालकांना सहाय्य करेल असं ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँटोनी अल्बनीज यांनी म्हटलं आहे.  लहान मुलांचा समाजमाध्यमं आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढत असून, त्याचे गंभीर परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहेत. या गोष्टीची देशातल्या  दोन तृतीयांश पालकांना चिंता वाटत असल्याचं राष्ट्रीय स्तरावरच्या सर्वेक्षणात आढळून आल्यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारनं ह...

August 14, 2024 1:15 PM

भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध

भारत आणि ऑस्ट्रेलियानं सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी सर्वसमावेशक आणि शाश्वत धोरण आखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य बळकट करण्याची गरज अधोरेखित केली आहे. नवी दिल्ली इथं काल पार पडलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया दहशतवादविरोधी संयुक्त कृती गटाच्या १४व्या बैठकीनंतर हे निवेदन जारी करण्यात आलं आहे. स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर दहशतवादाच्या धोक्याविषयी यावेळी चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे. नव्या आणि अत्याधुनिक तंत्रज...