July 16, 2024 3:47 PM

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २१ जुलैला भाजपाचं व्यापक अधिवेशन

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी, 21 तारखेला भाजपाच्या प्रदेश पातळीवरील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, खासदार, आमदार आणि अन्य प्रमुख कार्यकर्त्यांचं व्यापक अधिवेशन पुण्यात होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातले सर्व केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या विरोधात केल्या जाणाऱ्या मोर्चेबांधणीबद्दल महत्वपूर्ण चर्चा आणि काही निर्णय या अधिवे...

July 1, 2024 1:45 PM

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ४ जागांसाठीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला प्रारंभ

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ४ मतदारसंघातल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरु झाली. कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या तीन मतदार संघांची मतमोजणी नवीमुंबईत नेरुळ इथं होत असून मतपत्रिकांची प्राथमिक मोजणी पूर्ण झाली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा इथं मतमोजणी सुरू असताना एका मतदान केंद्रावर तीन मतपत्रिका जास्त निघाल्यानं गोंधळ उडाला. त्यामुळे संबंधित केंद्रावरची मतमोजणी स्थगित झाली आहे.

July 1, 2024 9:00 AM

विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची आज मतमोजणी

विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांसाठी झालेल्या मतदानाची आज मोजणी होणार आहे. नाशिक शिक्षक मतदार संघाची मतमोजणी नाशिक शहरात केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांनी काल याठिकाणी पाहणी करुन तयारीचा आढावा घेतला.

June 30, 2024 7:48 PM

मविआ आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढतील – शरद पवार

महाविकास आघाडीतले घटक पक्ष आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढवतील, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यात बदल होण्याची गरज आहे, ती पूर्ण करण्याची जबाबदारी विरोधी आघाडीवर आहे, असं ते म्हणाले. जागावाटपाबाबतची चर्चा अद्याप सुरु झालेली नाही, असं पवार यांनी सांगितलं. 

June 21, 2024 2:56 PM

केंद्रीय निवडणूक आयोगाची आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयारी सुरू

केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह हरयाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. हरयाणात ३ नोव्हेंबर रोजी, झारखंडमधे २६ नोव्हेंबर रोजी तर महाराष्ट्रात ५ जानेवारीला विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्यामुळे तिथं निवडणुका होत आहेत. तसंच जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातही विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. मतदार यादीत अद्ययावत करण्यासाठी दुसऱ्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमासाठी १ जुलै २०२४ हा अर्हता दिवस आहे.

June 19, 2024 6:50 PM

विधानपरिषद निवडणूक : काँग्रेसचे रमेश कीर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी कोकण पदवीधर मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. रमेश कीर हे पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील असा विश्वास असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.  

June 17, 2024 3:44 PM

विधानसभा निवडणुक : केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांची महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती

भारतीय जनता पार्टीनं विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांची महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव राज्याचे निवडणूक सहप्रभारी म्हणून काम पाहतील. हरियाणा, झारखंड, जम्मू आणि काश्मिर विधानसभा निवडणुकीसाठीही पक्षानं विविध केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांची प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.  

June 16, 2024 8:47 PM

विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा – मुख्यमंत्री शिंदे

पूर्ण ताकतीनं विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे, निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत. पक्षाच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या तयारीच्या अनुषंगानं आज पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक त्यांनी आज मुंबईत घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

June 16, 2024 8:48 PM

योग्य जागा दिल्या नाहीत तर ३० जागांवर निवडणूक लढणार – पीपल्स रिपब्लिकन पक्ष

विधानसभा निवडणुकीत महायुतीनं योग्य जागा दिल्या नाहीत तर आपण राज्यात ३० जागांवर निवडणूक लढणार असल्याचं पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी स्पष्ट केलं आहे. ते ठाण्यात बातमीदाराशी बोलत होते. राज्य मंत्रिमंडळात एक कॅबिनेट, एक राज्यमंत्री आणि एका महामंडळात पक्षाला प्रतिनिधित्व द्यावं, अशी मागणीही कवाडे यांनी केली आहे. केंद्रातल्या रालोआ सरकारनं कष्टकरी, शेतकऱ्यांसाठी काम करावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

June 17, 2024 2:30 PM

‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधे राष्ट्रवादी काँग्रेस ८५ ते ९० जागा मागणार’

आगामी विधानसभा निवडणुकीत ८५ ते ९० जागा लढवण्याचा इरादा राष्ट्रवादी काँग्रेसनं व्यक्त केला आहे. महायुतीमधे तेवढ्या जागा पक्ष मागणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी आज गोंदिया इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. लोकसभा निवडणुकीत NDA ला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी विधानसभा निवडणुकीत चित्र बदलेल असं ते म्हणाले.   राज्यात लवकरच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं पटेल यांनी सांगितलं. केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला मंत्रीपद आलं तर ते मलाच मिळेल, असं ते म्ह...