July 9, 2024 8:14 PM
आसाममध्ये पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ७२ वर
आसाममध्ये पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ७२ वर गेली आहे. राज्यात २७ जिल्ह्यांमधल्या २२ लाख नागरिकांना अजूनही पुराचा धोका आहे. पुरामुळे ४९ हजार हेक्टर क्षेत्रातल्या पिकांचं नुकसान झालं आहे. १२७ रस्ते आणि २ पुलांचंही नुकसान झालं आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या जवानांनी काल २१८ जणांची सुटका केली. ब्रह्मपुत्रा, आणि बराक, तसंच त्यांच्या उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. राज्य सरकारनं २४५ मदत शिबिरं आणि २९८ मदत वाटप केंद्र स्थापन केली आहेत. सध्या ५३ हजारांपेक्षा जास्त नागरिक मदत शिबिरांम...