September 18, 2024 7:28 PM

पीएम अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान सुरू ठेवायला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

पीएम आशा अर्थात पीएम अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान सुरू ठेवायला केंद्रीय मंत्रीमंडळाची आज मंजुरी मिळाली. दाळी, तेलबियांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासह यात किमान आधारमूल्य आणि बाजार भाव यातल्या फरकाची भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल. तसंच शेतकऱ्यांचं उत्पन्न सुरक्षित ठेवणं, ग्राहकांसाठी बाजारभाव स्थिर ठेवणं यावर यात भर दिला आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या कार्यकाळात यासाठी ३५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.  रबी हंगामाकरता २४ हजार ४७५ कोटी रुपयांच्या पोषण मूल्य आधारित खतांच्या सबसिडीला केंद्...

August 9, 2024 3:54 PM

कोकण रेल्वेच्या मार्गाच्या दुपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत लवकरच बैठक घेणार – केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

कोकण रेल्वेच्या मार्गाच्या दुपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत लवकरच संबधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक घेण्याचं आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं आहे. कोकण रेल्वेच्या मार्गाचं दुपदरीकरण करावं या मागणीसाठी खासदार रवींद्र वायकर यांनी वैष्णव यांना काल निवेदन दिलं होतं. कोकण रेल्वेच्या मार्गावरून दरवर्षी सुमारे ३ कोटी पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. मात्र, या मार्गावर एकच ट्रॅक असल्यानं प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या ...

July 24, 2024 6:48 PM

महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी भरघोस तरतूद केली असून राज्यातल्या अनेक रेल्वे प्रकल्पांची कामं हाती घेतल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी दरवर्षी सरासरी १ हजार १७१ कोटी रुपयांची तरतूद होत होती. गेल्यावर्षी ही तरतूद साडे १३ हजार कोटींहून अधिक होती, असं ते म्हणाले. युपीएच्या काळात सरासरी ५८ किलोमीटरचे रेल्वेमार्ग बांधले गेले. गेल्या १० वर्षात हे प्रमाण सरासर...

July 20, 2024 12:23 PM

सरकारी तंत्रशिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न-अश्विनी वैष्णव

केंद्र सरकार विविध उपक्रमांद्वारे शासकीय तंत्रशिक्षण क्षेत्राचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. वैष्णव यांनी काल मुंबईत महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली, या बैठकीदरम्यान ते बोलत होते. या क्षेत्रातील नवनवीन कल्पनांचे प्रस्ताव पाठवण्याचं आवाहन त्यांनी सरकारी तांत्रिक अभियांत्रिकी संस्थांना यावेळी केलं. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत उभारण्यात येणाऱ्य...

July 3, 2024 1:43 PM

कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून तंत्रज्ञानाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवणं हा भारताचा दृष्टिकोन – मंत्री अश्विनी वैष्णव

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेचा वापर करून तंत्रज्ञानाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवणं, हा भारताचा दृष्टिकोन असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. वैष्णव यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भारत जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेला प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकार लवकरच भारत ए आय मोहीम सुरु करणार असून त्यासाठी १० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असं त्यांनी सांगितलं. याशिवाय एक ए आय नवोन्मेष केंद्र देखील स्थापन केलं जाईल, ज्यामुळे उ...

June 19, 2024 8:53 PM

खरीप हंगामासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची १४ पीकांच्या MSPला मंजुरी

खरीप हंगामासाठी १४ पीकांसाठीच्या MSP अर्थात किमान आधारभूत किंमतीला केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली. उत्पादन खर्चाच्या तुलनेत ही किंमत किमान ५० टक्क्यांनी अधिक असेल याची खबरदारी घेतल्याचं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. धान, कापूस, ज्वारी, नाचणी, बाजरी, मका, मूग, तूर, उडीद यासारख्या धान्यांचं किमान आधारभूत मूल्य मंत्रीमंडळानं आज मंजूर केलं. यामुळं शेतकऱ्यांना एकूण २ लाख कोटी रुपयांचा लाभ मिळेल, असं ते म्हणाले.   वाढवण बंदराच्या उभारणीलाही परवानगी...