September 23, 2024 3:10 PM
विद्यापीठ अधिसभा निवडणुकीवर पक्षीय राजकारणाचा प्रभाव नसावा – आशिष शेलार
विद्यापीठ अधिसभा निवडणुकीवर पक्षीय राजकारणाचा प्रभाव नसावा असं मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज ते वार्ताहरांशी बोलत होते. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विद्यार्थ्यांपेक्षा मालकाचं हित जोपासणारे असल्याची टीका त्यांनी केली. निवडणुकीत राजकीय पक्षांचे झेंडे दिसू नयेत अशी विनंती आपण कुलगुरुंकडे केली असल्याचं ते म्हणाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केलेल्या आरोपा...