July 17, 2024 8:37 PM
पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा
आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रात पंढरपूर इथं वारकऱ्यांची अलोट गर्दी झाली आहे. श्री विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय महापूजा सपत्नीक केली. राज्यात भरपूर पाऊस-पाणी होऊ दे, माझा शेतकरी सुखी-समाधानी राहू दे अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलचरणी केली. मानाचा वारकरी प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्ह्यातील बाळू अहिरे आणि त्यांच्या पत्नी आशा यांना मान मिळाला. आषाढी यात्रेदरम्यान वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी केलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली. दर्शन...