September 17, 2024 8:23 PM

अरविंद केजरीवाल यांचा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

आतिशी या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील असं आम आदमी पार्टीने जाहीर केलं आहे. आमदारांच्या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्याआधी अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला.  पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत आतिशी मुख्यमंत्रीपदी राहतील हा निर्णय एकमताने घेतल्याचं दिल्ली सरकारमधले मंत्री गोपाल राय यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.

September 11, 2024 7:32 PM

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २५ सप्टेंबरपर्यंत वाढ

कथित मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयानं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी २५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीचा कालावधी संपल्यामुळे   राऊज ॲव्हन्यू न्यायालयातील सुनावणीसाठी तिहार कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांना हजर केलं. याआधीच सीबीआयनं कथित मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि इतर आरोपींविरोधात न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होते.   दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी...

August 14, 2024 1:16 PM

अरविंद केजरीवाल यांचा अंतरिम जामीन सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला

दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा अंतरिम जामीन सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावला. यावर केंद्रीय अन्वेषण विभागानं उत्तर देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आणि प्रकरणाची सुनावणी २३ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली.

August 12, 2024 1:20 PM

दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांची याचिका

कथित अबकारी धोरण घोटाळ्यात केंद्रीय अन्वेषण संस्थेने केलेली अटक कायम ठेवण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.  या खटल्यावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी विनंती ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आज सरन्यायाधीशांना केली. यावर विनंतीचा ई मेल तपासल्यानंतर सुनावणीची तारीख जारी केली जाईल, असं सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सांगितलं.    ५ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत दिल्ली उच्च न्य...

July 12, 2024 1:18 PM

दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण प्रकरणात सर्वोच्‍च न्‍यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

सर्वोच्‍च न्‍यायालयानं ईडीने दाखल केलेल्या कथित मद्य धोरण प्रकरणात  दिल्‍लीचे  मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज अंतरिम जामीन मंजूर केला.  ईडीनं केलेल्या अटकेला आव्हान देणारी केजरीवाल यांची याचिका न्‍यायाधीश संजीव खन्‍ना आणि दीपांकर दत्‍ता यांच्या  खंडपीठानं मोठ्या खंडपीठाकडे पाठवली आहे. तथापि  केजरीवाल यांना या प्रकरणी गेल्या २५ जूनला सी बी आय नं अटक केली होती, या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला नसल्यानं ते कारागृहातच राहतील.

July 2, 2024 1:05 PM

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी

कथित मद्य घोटाळा प्रकरणी कारागृहात असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज न्यायमूर्ती नीना बन्सल क्रिष्णा यांच्या पीठासमोर सुनावणी होणार आहे. सीबीआयने आपल्याला अटक करण्यासाठी कोणताही नवा पुरावा सादर केला नाही असं केजरीवाल यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे.

June 25, 2024 3:10 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला स्तगिती

दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला स्थगिती दिली आहे. ईडीनं सादर केलेली कागदपत्र विशेष न्यायालयानं नीट पाहिली नाही, असं कारण उच्च न्यायालयानं जामीनाला स्थगिती देताना दिलं आहे.

June 24, 2024 8:03 PM

अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या बुधवारी सुनावणी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे. कथित मद्य धोरण प्रकरणात जामीन प्रकरणी उच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. तसंच विशेष न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली होती. त्याला केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

June 21, 2024 10:09 AM

अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याशी संबंधित प्रकरणामध्ये जामीन मंजूर

दिल्लीचे मुख्यमंत्री तसंच आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याशी संबंधित प्रकरणामध्ये दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने काल जामीन मंजूर केला. याआधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, पुन्हा त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. केजरीवाल यांच्या जामीनाला 48 तासांची स्थगिती देण्याची इडी ने केलेली मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. या प्रकरणी पुढील युक्तिवाद आज न्यायाधीशांसमोर करता येतील, असं न्यायालयाने म्हंटलं आहे.

June 19, 2024 8:38 PM

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली विशेष न्यायालयानं आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ केली आहे. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना तिहार तुरुंगातून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आलं. अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयानं अटक केली होती. या प्रकरणात माजी मंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह एकूण ३८ आरोपी आहेत.