September 18, 2024 1:17 PM
आंध्र प्रदेशातल्या पुरग्रस्त कुटुंबांना मदतीची घोषणा
आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथे आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबाना मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी काल मदतीची घोषणा केली. विजयवाडा इथल्या सर्व ३२ प्रभागांमध्ये नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत दिली जाईल, तसंच पूरबाधित घरांची दुरुस्तीही केली जाईल, असं मुख्यमंत्री नायडू यावेळी म्हणाले. पूरग्रस्त भागात तळमजल्यावर राहणाऱ्या कुटुंबांना प्रतिकुटुंब २५ हजार रुपये, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबांना १० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. इतर बाधित भागातल्या रहिवाशांनाही १०...