September 23, 2024 3:04 PM

अमरावतीत खासगी बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात ४ ठार, २५ जखमी

अमरावती जिल्ह्यात मेळघाटातल्या सेमाडोह परिसरात आज खासगी बस पुलावरून नदीत कोसळून झालेल्या अपघातात ४ जण ठार तर २५ जण जखमी झाले. यापैकी ७ जणांची प्रकृती गंभीर आहे. ही बस अमरावतीहून धारणीच्या दिशेने प्रवास करत होती. चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस पुलावरून नदीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. बसमधले अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी आणि पोलीस पथक मदतकार्य करत आहेत.

June 17, 2024 3:35 PM

‘नवनीत राणांच्या पराभवामुळे अमरावतीचा विकास वीस वर्षे मागे गेला’

अमरावती लोकसभा मतदारसंघात अनेक विकासकामं केलेली असतानाही महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानं त्याचं चिंतन आपण करत असल्याचं स्वाभीमानी पक्षाचे नेते, आमदार रवी राणा यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. तसंच नवनीत राणा यांच्या पराभवामुळे अमरावती जिल्ह्याचा विकास वीस वर्षे मागे गेला असंही ते म्हणाले. महाविकास आघाडीने अपप्रचार, खोटी आश्वासनं, खोटी प्रलोभनं देऊन जनतेची दिशाभूल केली असा आरोपही राणा यांनी केला.