September 26, 2024 2:30 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मू इथं प्रचारसभा घेणार

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांचा प्रचार सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मू इथं प्रचारसभा घेणार आहेत. कठुवा आणि उधमपूर जिल्ह्यातल्या चार प्रचारसभांना ते संबोधित करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २८ सप्टेंबरला जम्मू इथं प्रचारसभा घेणार आहेत. दरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जम्मूमध्ये प्रचारसभा घेतली. तसंच माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेतली. हरियाणा विधानस...

September 24, 2024 1:45 PM

केंद्रीय मंत्री अमित शाह उद्या संभाजीनगरच्या दौऱ्यावर

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निडवणुकीच्या अनुषंगाने ते पक्ष कार्यकर्त्यांशी तसंच अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आज छत्रपती संभाजीनगर इथं येत आहेत.

September 21, 2024 2:34 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २४ सप्टेंबरपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २४ सप्टेंबरपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथं भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याचं भाजपाच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी ते नाशिक आणि कोल्हापूरला भेट देतील.

September 20, 2024 7:58 PM

मार्च २०२६पर्यंत देशाला नक्षलवाद मुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट्य – गृहमंत्री अमित शहा

  झारखंडच्या साहेबगंज जिल्ह्यात भाजपाच्या परिवर्तन यात्रेची सुरवात आज गृहमंत्री अमित शाह यांनी केली. भोगनाडीहपासून संथाल परगणा प्रभागापर्यंतच्या या यात्रेनं राज्यातला निवडणूक प्रचार सुरु झाल्याचं गृहमंत्र्यांनी पोलीस लाईन मैदानावरच्या जनसभेला संबोधित करताना सांगितलं.   झारखंडमधे भाजपाची सत्ता आली तर ७५ वर्षे किंवा अधिक वयाच्या माणसांना दहा लाखांपर्यंत निःशुल्क सुविधा मिळेल असंही ते म्हणाले.झारखंड सरकार मतांसाठी घुसखोरांचा बचाव करत असल्याचा आरोप शाह यांनी गिरीडोह इथल्या सभेत केला.

September 19, 2024 12:53 PM

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत राष्ट्रीय परिषदेला संबोधित करणार

केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या शंभर दिवसांत सहकार मंत्रालयाने सुरू केलेल्या योजना आणि धोरणांविषयी माहिती देण्यासाठी  केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत राष्ट्रीय परिषदेला संबोधित करणार आहेत.   या शंभर दिवसांत सहकार क्षेत्रासाठी अनेक महत्वाची पावलं उचलण्यात आली, यामुळे सहकार व्यवस्थेला नव्या ताकदीने आणि गतीने पुुढे जायला मदत होईल, असं शहा आपल्या समाजमाध्यमावरल्या पोस्टमध्ये म्हणाले.

September 17, 2024 2:08 PM

मणिपूरमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारनं आराखडा तयार केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन

मणिपूरमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारनं आराखडा तयार केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या तिसऱ्या कार्यकाळात केंद्र सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमीत्त त्यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी संवाद साधला. मणिपूरमधला हिंसाचार वांशिक स्वरुपाचा आहे, आणि तो रोखण्यासाठी सरकार कुकी आणि मैतेई या दोन्ही समुदायांसोबत चर्चा करत आहे, असं त्यांनी सांगितलं. तिथली परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल अशी आशाही त्यांनी व्यक्त क...

September 14, 2024 6:49 PM

चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन

देशाला एकसंध ठेवण्यात हिंदी भाषेची महत्त्वाची भूमिका असून या भाषेचं रक्षण आणि संवर्धन करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं राजभाषा हीरक जयंती उत्सवनिमित्त आयोजित चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते.    हिंदी आणि इतर भारतीय भाषांमध्ये कोणतीही स्पर्धा नसून त्या एकमेकांना पूरक असल्याचं शहा म्हणाले. मुलांना मातृभाषेत शिक्षण मिळावे, यासाठी राष्ट्रीय शैक...

September 14, 2024 10:31 AM

अमित शहा यांच्याहस्ते 7व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेचं उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत, 7 व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेचं उद्घाटन केलं. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेदरम्यान, केंद्र सरकार, राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटनांतील उच्चायुक्तांच्या सहकार्याने, उद्भवणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी एक पथदर्शी आराखडा तयार करण्यात येणार आहे.   शहा यांच्या हस्ते काल पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेच्या डॅशबोर्डचं अनावरण झालं. हा डॅशबोर्ड राष्ट्रीय गुन्हे गोंदण...

September 14, 2024 9:24 AM

अंदमान निकोबारमधल्या पोर्ट ब्लेअरचं नामांतर ‘श्री विजय पुरम’ होणार

केंद्र सरकारने, अंदमान आणि निकोबर बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेयरचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता या शहराचं नामांतर ‘श्री विजय पुरम’ असं करण्यात येणार आहे.   केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी काल समाज मध्यमांवरील संदेशातून ही घोषणा करताना, वासहातवादी साम्राज्याच्या सर्व पाऊलखुणा मिटवून टाकण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.   देशाच्या इतिहासात पोर्ट ब्लेयरला अनन्यसाधारण महत्व असून, ‘श्री विजय पुरम’ हे देशाने स्वातंत्र्यलढ्यात मिळवलेल्या विजयाच...

September 11, 2024 2:38 PM

सायबर गुन्ह्यांना अटकाव घालण्यासाठी येत्या ५वर्षांत ५हजार सायबर कमांडोना प्रशिक्षण देण्याची योजना

सायबर सुरक्षा हा राष्ट्रीय सुरक्षेचा अविभाज्य भाग असून केंद्राने सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी येत्या पाच वर्षांत पाच हजार सायबर कमांडोना प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे. अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंट-आय फोर सी-च्या अर्थात भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या पहिल्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात दिली. सायबर गुन्ह्यांना सीमा नसल्यामुळे या धोक्याचा सामना करण्यासाठी सर्व संबंधितांनी एकत्र येण्याचं आवाहन शहा यांनी केलं.