September 10, 2024 1:07 PM

एम्स्ने नवी दिल्ली इथं तंबाखू निर्बंध केंद्राचं केलं उदघाटन

एम्स् अर्थात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेनं  आज नवी दिल्ली इथं TCC म्हणजेच  ‘तंबाखू निर्बंध केंद्राचं’ उदघाटन केलं. TCC हा NDDTC अर्थात राष्ट्रीय औषध अवलंबित्व उपचार केंद्र आणि एम्स् चा पल्मोनरी, क्रिटिकल आणि स्लिप मेडिसिन विभाग यांच्यातल्या समन्वयातून उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून, रुग्णांना तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या घातक परिणामांबाबत वैद्यकीय तज्ञांकडून समुपदेशन केलं जाणार आहे, असं विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. अनंत मोहन यांनी आकाशवाणीशी...

August 21, 2024 7:45 PM

निवासी डॉक्टरांनी रुग्णांच्या हितासाठी पुन्हा कामावर रुजू होण्याचं एम्सचं आवाहन

निवासी डॉक्टरांनी रुग्णांच्या हितासाठी पुन्हा कामावर रुजू होण्याचं आवाहन एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान परिषदेनं एका पत्रकाद्वारे केलं आहे. एम्सनं आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या कोणत्याही तत्काळ समस्यांचं निराकरण करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये इतर चार सदस्यांसह रुग्णालयाचे अधिष्ठातांचा अध्यक्ष म्हणून समावेश करण्यात आला आहे, असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.  संस्थेनं आरोग्य सेवा कर्मचारी, रुग्ण आणि अभ्यागतांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात अंतर्गत सुरक्षा ऑडिटसाठी स्वतंत्...

August 20, 2024 7:23 PM

मंकीपॉक्स विषाणूच्या संशयित रुग्णांवर उपचार करण्याविषयी एम्सकडून मार्गदर्शक सूचना जारी

मंकीपॉक्स विषाणूच्या संशयित रुग्णांवर उपचार करण्याविषयी एम्स अर्थात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ताप, पुरळ असलेल्या किंवा मंकीपॉक्स असणाऱ्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी निवडलं जाईल, असं एम्सनं म्हटलं आहे. संशयित रुग्णाला तत्काळ विलगीकरणात ठेवण्यात यावं असंही एम्सनं मार्गदर्शक सूचनेत म्हटलं आहे.  एम्सने मंकीपॉक्स रुग्णांसाठी पाच खाटा आरक्षित ठेवल्या असून या रुग्णांवर सफदरजंग रुग्णालयात उपचार करण्यात येतील.  जागतिक आरोग्य संघट...